Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सार्वजनिक शांतता बिघडवणार्‍या 13 जणांविरूद्ध गुन्हा

पुणे ः पुणे शहरातील कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्ग्यावर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार असल्याची खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांतता

डोक्यातला बर्ड फ्लू
पतीने आत्महत्या केल्याने पत्नीविरोधात गुन्हा दाखल
पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा

पुणे ः पुणे शहरातील कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्ग्यावर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार असल्याची खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांतता बिघडवने प्रयत्न करणार्‍या 13 जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करून तो पाडण्यात येणार असल्याची अफवा सोशल मीडियात पसरविण्यात आली. त्यानंतर चार ते पाच हजार जण कसबा परिसरात जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.त्यामुळे समाजमाध्यमातून अफवा परसल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या भागात दीड हजारपेक्षा अधिक पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. समाजमाध्यमातून अफवा पसरविणार्‍यांविरुद्ध 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सुभाष जरांडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

COMMENTS