सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

अहमदनगर : परमीट रूम, हॉटेल, दुकाने, चहाचे हॉटेल यांना सरपंच किंवा उपसरपंच अशी नावे दिल्याचे पाहायला मिळते. मात्र, अशी नावे देणे हा त्या संवैधानिक पदा

बाबासाहेब दहे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
भुयारी गटार योजनेची फेज-2 होणार? ; काम रखडल्याने महासभेत नगरसेवक संतप्त, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे सूतोवाच
वर्षा सुरासे-साळुंकेंना उत्कृष्ट योग शिक्षिका पुरस्कार

अहमदनगर : परमीट रूम, हॉटेल, दुकाने, चहाचे हॉटेल यांना सरपंच किंवा उपसरपंच अशी नावे दिल्याचे पाहायला मिळते. मात्र, अशी नावे देणे हा त्या संवैधानिक पदांचा अवमान असून ती रद्द करण्यात यावीत, अशी मागणी राहुरी तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण अंत्रे यांनी केली आहे. अंत्रे यांनी यासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन अशी नावे कोणी दिली, त्यांची नोंदणी कोणी केली याची चौकशी करून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन अंत्रे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविले आहे.अंत्रे यांनी म्हटले आहे की, सरपंच या पदाला कायद्याने मोठे महत्त्व आहे. आपण सरपंचांना गावाचे प्रथम नागरिक समजतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958-59 मधील कलम 30 नुसार ही पदे संवैधनिक आहेत. त्यांचा वापर अलीकडे व्यवसायाची नावे आणि जाहिरातीसाठी केला जात आहे. कापड दुकान, बार, रेस्टॉरंट, चहाची हॉटेल अशा अनेक ठिकाणी ही नावे पाहायला मिळतात. अशी नावे घेऊन नोंदणीसाठी गेलेल्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून अगर अन्य नोंदणी कार्यालयांकडून परवाने कसे मिळतात? हे योग्य आहे का? याची चौकशी करण्यात यावी. रस्त्याने जाताना हॉटेल, ढाबा व अन्य ठिकाणी सरपंच, उपसरपंच अशी नावे वाचून अक्षरशः चीड येते. या संवैधानिक पदाच्या नावांचा अशा प्रकारे दुरुपयोग व अपमान होत आहे. प्रशासन आणि सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर भविष्यात अनेक आस्थापना, बार, अथवा हॉटेलांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार अशी नावे दिलेली पहायला मिळतील. या प्रकारामुळे या महत्वाच्या पदाबरोबरच आपला महाराष्ट्र अपमानित होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असेही अंत्रे यांनी म्हटले आहे.

COMMENTS