Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपा शहरात लाठीचार्ज विरोधात पाळला बंद

सुपा/प्रतिनिधी ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील बांधव उपोषणासाठ

कोरोणाची तिसरी लाट रोखण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज, आ,निलेश लंके l पहा LokNews24
एटीएम मशीन चोरणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या पारनेर पोलीसांनी आवळल्या मुस्क्या
 मुंबईतील चित्रपट नगरी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री पळवून नेतील-  आमदार रोहित पवार 

सुपा/प्रतिनिधी ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील बांधव उपोषणासाठी बसले आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी  मराठा समाजाच्या वतीने सुपा शहर बंद ठेवुन कडकडीत बंद पाळण्यात आला.
जालना येथील उपोषण कर्त्यावर झालेल्या अमानुष लाठीमारांचा निषेध म्हणून सुपा येथील कार्यसम्राट सरपंच योगेश रोकडे, दत्तानाना पवार(उपसरपंच), ग्रा.पंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी सुपा पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधव, सुपा पंचक्रोशीतील सकल मराठा बांधव ही मोठ्या प्रमाणात हजर होते. जालना येथील घटणेचे राज्यात तीव्र पडसाद उमटले असून सुपा ग्रामपंचायत व सकल मराठा समाजाच्या वतीने बंद ला उत्सर्पूत प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले. या दरम्यान छोटी चहाच्या टपरी पासुन सर्वच दुकाने बंद ठेवली होती. जालना-आंबड येथील मराठा आरक्षण अंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, हवेत गोळीबार, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलन चिरडण्यात आले, अनेक जन जखमी झाले, गोळीबारात कित्येक महीला जखमी झाल्या. या घटनेचे पारनेर तालुक्यात तीव्र  पडसाद उमटले असुन अनेकांनीय या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. जालन्यात मराठा अदोंलकावर जो अमानुष लाठीहल्ला झाला त्यामुळे राज्यभर मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून पारनेर तालुक्यातील सुपा शहर हे सुध्दा कडकडीत बंद ठेवण्यात आले असून शाळा, कॉलेज वगळता सर्व बंद ठेवण्यात आले होते. बंद हा शांततेच्या मार्गाने पाळण्यात आला. यावेळी सुपा पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

COMMENTS