Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींना नोटीस

29 एप्रिलपर्यंत निवडणूक आयोगाकडे द्यावे लागणार उत्तर

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडतांना दिस

राऊतांनी टाइमपास न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे | LOK News 24
सहा वाहनांचा भीषण अपघात, 4 ठार, 8 जण जखमी | LOKNews24
भीम आर्मी आक्रमक… आमरण उपोषणाला सुरुवात

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडतांना दिसून येत आहे. याच आरोप-प्रत्यारोपांच्या विरोधात काँगे्रसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाची तक्रार केली आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींवरून आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाला उत्तरे द्यावी लागणार आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समुदायाचा उल्लेख करत केलेल्या टिप्पणीवर काँग्रेस केंद्रीय आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर आयोगाने भाजपला नोटीस पाठवली. त्यामुळे आता भाजपला 29 एप्रिलला 11 सकाळी वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. तर नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी यांच्या एका विधानावरून आयोगाने काँग्रेसला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर द्यावे लागणार आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार केली. तर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने लोक प्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत 77 कलमांतर्गत स्टार प्रचारकांच्या पक्षाच्या अध्यक्षांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षांच्या अध्यक्षांना आयोगाच्या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. तसेच पक्षांच्या अध्यक्षांना पाठवलेल्या नोटीसमध्ये नेत्यांनी वक्तव्य जबाबदारीने करावे, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात एका समुदायाचा उल्लेख करत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांचा एका विधानाचा दाखला देत आयोगात तक्रार दिली. त्यामुळे आयोगाकडून दोन्ही नेत्यांना संयम राखून भाषणे करण्यास सांगितले आहे.

COMMENTS