Homeताज्या बातम्यादेश

देशातील 88 जागांसाठी आज मतदान

मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान

नवी दिल्ली ः लोकशाहीतील उत्सव अर्थात मतदानाचा दुसरा टप्प्याला आज शुक्रवारपासून प्रारंभ होत असून, आज देशातील 88 जागांसाठी मतदान होणार असून, यामध्य

पडळकर मंत्रिपद न मिळाल्यावर कोणत्या पक्षात विसर्जन होणार ते शोधा
खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकर्‍यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!
आधार कार्ड मागितल्याने महिला कर्मचारीच्या लगावली कानशिलात.

नवी दिल्ली ः लोकशाहीतील उत्सव अर्थात मतदानाचा दुसरा टप्प्याला आज शुक्रवारपासून प्रारंभ होत असून, आज देशातील 88 जागांसाठी मतदान होणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील 8 जागांचा समावेश आहे. अनेक दिग्गज उमेदवारांसाठी या दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. केरळमध्ये 14 जागांसाठी मतदान होणार असून, कर्नाटकातील 28 जागा, महाराष्ट्र 8, उत्तर प्रदेश 08, मध्य प्रदेश 06, आसाम 05, बिहार 05, छत्तीसगड 03, पश्‍चिम बंगाल 03, मणिपूर 01, त्रिपुरा 01, जम्मू आणि काश्मीर 01 या 13 राज्यांतील 88 जागांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 जागांवर केवळ सरासरी 55 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. तर दुसरीकडे उष्णतेची लाट या मतदानांवर परिणाम करण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 55 तर देशात सरासरी 62 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, या दुसर्‍या टप्प्यामध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (तिरुवनंतपुरम), भाजपच्या तेजस्वी सूर्या (कर्नाटक), हेमा मालिनी आणि अरुण गोविल (दोघेही उत्तर प्रदेश), काँग्रेस नेते राहुल गांधी (वायनाड) आणि शशी थरूर (तिरुवनंतपुरम), कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश (काँग्रेस), कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (जेडीएस) या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील जागांचा विचार करता, यापैकी 5 जागा पश्‍चिम विदर्भात, तर 3 जागा मराठवाड्यात आहेत. पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा व यवतमाळ-वाशीम या जागांवरील उमेदवारांचे भवितव्य त्यांच्या जातीय समीकरणांवर आधारित आहे. यातील अमरावती लोकसभा मतदार संघात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना मैदानात उतरवले आहे. असून, महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. राणा या भाजपमध्ये नुकत्याच दाखल झाल्या आहेत. मात्र त्यांना बच्चू कडू यांचा कडवा विरोध होतांना दिसून येत आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे दिनेश बूबही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अमरावतीची लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अकोला मतदारसंघात यंदा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर बाजी मारता का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार अनुप धोत्रे व काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या मतदार संघात मुस्लिम मतदारांचा आकडा 20 टक्के आहे. त्यामुळे ही मते निर्णायक ठरणार आहे.  

महाराष्ट्रातील या 8 मतदारसंघाचा समावेश – लोकसभा निवडणुकीतील दुसर्‍या टप्प्यासाठी आज शुक्र्रवारी मतदान होत असून, यामध्ये महाराष्ट्रातील 8 मतदारसंघाचा समावेश आहे. या 8 मतदारसंघामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, बुलढडाणा, हिंगोली, नांदेड़ आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे. अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उभे असून, याठिकाणी काँगे्रस आणि महायुतीचा उमेदवार मैदानात असल्यामुळे त्रिशंकु निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये महायुतीच्या नवनीत राणा यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत बच्चू कडू यांच्या उमेदवारांचा कडवा सामना करावा लागणार आहे. तर परभणीतून महादेव जानकर यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

COMMENTS