Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक आयोगाकडून अजित पवारांसह बावनकुळेना नोटीस

मुंबई ः देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसून येत आहे. त्यातच  निव

WI दौऱ्यासाठी T20 टीमची घोषणा
राज्य सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यास यशस्वी ; मुंबई उच्च न्यायालयाची कौतुकाची थाप
राजुरीच्या पोलीस पाटलाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई ः देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसून येत आहे. त्यातच  निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या भंगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस पाठवल्या आहेत. यासोबतच पंकजा मुंडे, हेमंत गोडसे, भास्कर भगरे आणि बजरंग सोनवणे यांचा सामावेश आहे. त्यानंतर आता आयोगाने आचारसंहितेच्या भंगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस पाठवल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस धाडली आहे. आचारसंहितेच्या भंगप्रकरणी नोटीस धाडली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आणि इतर लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभांमध्ये भाषण करताना प्रभाव टाकताना आमच्या उमेदवारांना मतदान केल्यास शासकीय निधी करू, असे विधान केल्याचा आयोगाचा आरोप आहे. या स्वरुपाच्या विधाने वारंवार करण्यात येत असल्याचा आरोप आयोगाने केला. त्यानंतर आयोगाने अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या भंगप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना आयोगाची नोटीस बजावली आहे. या दोन्ही नेत्यांनी भाषण करताना आश्‍वासन न देण्याचे आदेश असताना उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मतदारांना प्रलोभने दाखवली जात असल्याच्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आली आहे.  

COMMENTS