खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोपरगाव पोलीसांकडुन अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोपरगाव पोलीसांकडुन अटक

 कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजी.नं. १८/२०२१ कलम १७४ सीआर, पी.सी.प्रमाणे दि १४ मे २०२१ रोजी दाखल असुन,सदर गुन्हा मधील मयत-सुवर्णा विजय उर्फ बंडु गवळी,रा.मढी खुर्द, ता.कोपरगाव हिचे व तिचा पती आरोपी विजय उर्फ बंडु आप्पासाहेब गवळी,रा.मढी खुर्द,ता.कोपरगाव यांच्यात दि १३ मे

करुणा धनंजय मुंडे यांनी केली नव्या शिवशक्ती पक्षाची घोषणा
जायकवाडीला पाणी सोडण्याचा घातक निर्णय शासनाने घेऊ नये ः शिंदे
टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या सभेत एकजुटीचा नारा

कोपरगाव शहर प्रतिनिधी-   कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजी.नं. १८/२०२१ कलम १७४ सीआर, पी.सी.प्रमाणे दि १४ मे २०२१ रोजी दाखल असुन,सदर गुन्हा मधील मयत-सुवर्णा विजय उर्फ बंडु गवळी,रा.मढी खुर्द, ता.कोपरगाव हिचे व तिचा पती आरोपी विजय उर्फ बंडु आप्पासाहेब गवळी,रा.मढी खुर्द,ता.कोपरगाव यांच्यात दि १३ मे २०२१ रोजी रात्री  ८ वा.सुमारास झालेल्या भांडणात आरोपीने मयताचे डोक्यावर मागील बाजुस काहीतरी टणक शस्त्राने मारुन जीवे ठार मारले आहे व त्यानंतर मृत शरीरावर काहीतरी ज्वालाग्रही पदार्थ टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवुन ठेवले व तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले व मयताने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे तपासात निष्न झाल्याने पोहेकॉ/१९० अमरनाथ वेजीनाथ गवसने,नेम-कोपरगाव तालुका पोस्टे यांच्या फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोस्टे गुरनं १५९/२०२१ कलम ३०२,२०१ भादवि प्रमाणे दि १५ मे २०२१  रोजी दाखल करण्यात आला आहे.  सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा केल्यापासुन फरार होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरीष्टांनी-दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाने तपास सुरु होता, सदर आरोपीचे शोध कामी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, श्री दौलत जाधव यांच्या सुचनेप्रमाणे पोहेकॉ/इरफान शेख ,पोकॉ/८६४ आंबादास वाघ ,पोकॉ/२४५९ रमेश झडे यांनी तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे आरोपी विजय उर्फ बंडु आप्पासाहेब गवळी,वय-३३ वर्षे,रा.हनुमान मंदीराजवळ मढी खुर्द,ता.कोपरगाव यास लोणीकंद,ता.हवेली,जि.पुणे येथुन ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्ह्या बाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची माहिती दिली. सदर आरोपीस मा.न्यायालयात हजर केले असता,मा.न्यायालयाने आरोपीस दि २० मे २०२१  पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

COMMENTS