Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावात नको बार-नको वाईन शॉप; वाठारच्या महिला पाठोपाठ आता पुरूषांचीही सुर

कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील वाठार येथे काल महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज पुरूषांचीही ग्रामसभा झाली. या सभेत दे

शिवशाही सरपंच संघाकडून स्व. शिवाजीराव देसाई आदर्श ग्रामसह आदर्श सरपंच पुरस्कार
म्हसवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत
तंत्रशिक्षणाबरोबर व्यवस्थापन शिक्षणात देखील आरआयटी अग्रेसर : डॉ. सुषमा कुलकर्णी

कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील वाठार येथे काल महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज पुरूषांचीही ग्रामसभा झाली. या सभेत देशी-विदेशी दारू, वाईन शॉप आणि बियर बार दुकानांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. या विषयाला महिला पाठोपाठ पुरूषांनीही एकमुखाने हातवर करून विरोध दर्शविला आहे. यापुढे गावात नको बार, नको देशी-विदेशी दारू की नको वाईन शॉपी असे म्हणत उपस्थित ग्रामस्थांनी विरोध केला.
वाठार ग्रामपंचायतीने महिला व पुरूषांची स्वतंत्र ग्रामसभा आयोजित केली होती. यामध्ये प्रामुख्याने गावात देशी-विदेशी दारू दुकान (वाईन शॉप) आणि बिअर बारला परवाना देण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोरे, रंजना माने, स्वप्निल कानडे, अभिजीत पाटील, ग्रामसेवक रियाज मोमीन, क्लार्क अनिकेत माने उपस्थित होते.
ग्रामसेवक रियाज मोमीन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. आबासाहेब भिमराव पाटील (रा. वाठार) यांना स्वः मालकीच्या जागेत बिअर बार व दारू दुकान सुरू करण्यासाठी ना-हरकत दाखल मिळावा, असा अर्ज ग्रामपंचायतीकडे केला होता. यावर पुरूषांचे मत काय आहे, असे ग्रामसेवकांनी विचारताच पुरूषांनी उपस्थितांतील बहुसंख्यांनी हातवर करत विरोध केला. काल सभेला 180 महिला उपस्थित होत्या. तसेच आजच्या 140 पुरूष उपस्थित होते. त्यापैकी 75 पुरूषांनी बार, दारू दुकान व्हावे या ठरावाच्या विरोधात हात वर केला. तसेच 22 पुरूषांनी ठरावच्या बाजूने मतदान केले. तर उर्वरीत 43 जणांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे वाठार गावात आता यापुढे बार, देशी-विदेशी दारू किंवा वाईन शॉप होवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडली.

COMMENTS