Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीन देसाई यांनी आत्महत्या करत संपवली जीवनयात्रा

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली अ

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणार – महापौर रोहिणी शेंडगे
खत खरेदी करतांना विचारली जातेय जात
छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ मंत्री पदाचा व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा- करण गायकर 

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शकही होते. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जेजे कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे शिक्षण घेतले होते. 1987 सालापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकिर्द सुरू केली आहे. मुंबईजवळील कर्जतमध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ सुरू केला होता. या स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन चंद्रकांत देसाई हे गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त एनडी स्टुडिओमध्ये थांबलेले होते. परंतु बुधवारी सकाळी स्टुडिओतील कर्मचार्‍यांना देसाई त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे एनडी स्टुडिओमध्ये एकच खळबळ उडाली. कर्मचार्‍यांनी या प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांचा मृतदेह फासावरून खाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु त्यांनी आत्महत्या केली आहे की यामागे घातपात आहे?, याचा पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

नितीन देसाईंवर होते 249 कोटींचे कर्ज- ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब बुधवारी उजेडात आली. त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मृत्यूपूर्वी त्यांच्यावर तब्बल 249 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नितीन देसाई यांनी काही वित्तीय संस्थांकडून ठराविक मुदतीचे कर्ज घेतले होते. यामुळे त्यांचा जीव की प्राण असणार्‍या एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. कलिना येथील एडलवाइस अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने यासंबंधी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. पण जिल्हाधिकारी कार्यालयाने जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजुरी दिली नव्हती. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एनडी स्टुडिओच्या जप्तीसंबंधीचा अर्ज आपल्या कार्यालयाला मिळाल्याची पुष्टी केली आहे.

व्हॉइस क्लीपमध्ये 4 उद्योगपतींचा उल्लेख- सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे अवघ्या कलाविश्‍वात खळबळ माजली आहे. त्यांनी सुसाइड करण्यापूर्वी काही व्हॉइस क्लीप रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली. या क्लीपमध्ये 4 उद्योगपतींची नावे असल्याचा दावा केला जात आहे. या व्हॉइस नोट्समध्ये 4 व्यावसायिकांची नावे आहेत. त्यांनी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता हे चारही व्यावसायिक चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची भीती आहे. पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचीही माहिती आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नितीन देसाई यांनी दिल्लीहून परतल्यानंतर लगेचच आत्महत्या केल्यामुळे त्यांनी विमान प्रवासात आत्महत्या करण्याची मानसिक तयारी केली असावी, असा दावा केला जात आहे.

COMMENTS