Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी बलाढ्य तर विकास आघाडीसमोर ऐक्याचे आव्हान

मंत्री-आमदार- खासदार यांचे शर्थीचे प्रयत्नइस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत राजकीय निर्णय हे स्थानिक पातळीवर न होता या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी ठर

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची उद्या प्रकट मुलाखत
चार गावच्या टाक्यांसह 72 नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता
सरकारी नोकर्‍यांमध्ये कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : आ. पृथ्वीराज चव्हाण

मंत्री-आमदार- खासदार यांचे शर्थीचे प्रयत्न
इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत राजकीय निर्णय हे स्थानिक पातळीवर न होता या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी ठरवणार असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी पालिका निवडणूक राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिवसेना यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या निवडणुकांचे परिणाम हे आगामी विधानसभेवर उमटणारे आहेत. त्यामुळे इस्लामपूर पालिकेवर आपलीच सत्ता आणण्यासाठी मंत्री जयंत पाटील तसेच माजी खा. राजू शेट्टी, माजी मंत्री आ. चंद्रकांत पाटील हे प्रामुख्याने शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

इस्लामपूर / हिंम्मत कुंभार : इस्लामपूर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यावर्षीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बलाढ्य तर विकास आघाडी समोर ऐक्याचे आव्हान असणार आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस शिवसेना, भाजप, वंचित आघाडी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय हे पक्ष वेगवेगळे लढणार आहेत की विकास आघाडी करून लढणार आहेत. याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात माजी खा राजू शेट्टी, दिवंगत नानासाहेब महाडीक, माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत, विक्रमभाऊं पाटील, राहुल महाडीक, सम्राट महाडीक, निशिकांत पाटील, वैभव पवार, आनंदराव पवार यांनी विकास आघाडी करून लढवली होती. नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादीला 14, शिवसेना 5, भाजप 8 तर अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या. निशिकांत पाटील यांनी थेट नगराध्यक्ष निवडणूकीत दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्या सत्तेला सुरुंग लावत निवडणूक जिंकली होती. या पाच वर्षांच्या काळात नगरपंचायतच्या राजकारणात बरेच पुलाखालून पाणी गेले. मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय चाली खेळत अपक्ष नगरसेवक दादासो पाटील यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा मिळवत उपनगराध्यक्ष पद ही पदरात पाडून घेतले. यामुळे पालिकेतील सर्व समित्यांचे सभापती पद राष्ट्रवादीला मिळाले.
इस्लामपूर शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये विजयभाऊ गट, डांगे गट, खंडेराव जाधव गट, शहाजीबापू गट, जयवंत आबा गट अशी वेगवेगळी राजकीय चूल आहे. भाजप व काँग्रेस यांचाही गट सक्रिय आहे. शहराच्या राजकारणाचा विचार केला तर सर्वच गट हे राजकीय प्राबल्य असणारे प्रमुख गट आहेत. मंत्री जयंत पाटील यांची नगरपंचायतमधील राजकीय मदार ही या गटावर अवलंबून आहे. इस्लामपूर शहरात शिवसेना व आरपीआयकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यांची मते ही काही प्रभागात निर्णायक ठरणार हे निश्‍चित आहेत.
नुकतीच झालेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला होता. या राजकीय खेळीच्या पार्श्‍वभूमीवर इस्लामपूर नगरपालिकेत मंत्री पाटील हे महाआघाडीचा प्रयोग करणार का? तसेच बलाढ्य अशा राष्ट्रवादी विरोधात विकास आघाडीला ऐक्याचे आव्हान असणार आहे. याकडेही सर्व पक्षाचे नेते व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS