Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी महिला आघाडीचा घर टू घर प्रचारात आघाडी

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ इस

म्हसवडमध्ये धुवांधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज; जिल्हा रुग्णालयात 100 बेडसह दोन आसीयू राखीव : डॉ. सुभाष चव्हाण
सातारा जिल्ह्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे भविष्य काय?

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर शहरात घर टू घर पोचत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना शहरातील महिलांनी साहेब हे आमचे भाऊ आहेत. त्यांनी आम्हा महिलांचे आरोग्य,शिक्षण व रोजगाराची काळजी घेतली आहे. महिलांचा सन्मान व आदर केलेला आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहोत, असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साहेबांचा विजय निश्‍चित आहे. या विक्रमी विजयात आम्ही महिला मोठे योगदान करू, असा विश्‍वास महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, माजी नगरसेविका अ‍ॅड. कोमल पाटील, प्रदेश सदस्या कमल पाटील, माजी शहराध्यक्ष रोझा किणीकर, सरचिटणीस उषा मोरे-पंडीत, उपाध्यक्ष मनिषा पेठकर, मालन वाकळे, योगिता माळी, सुप्रिया पेठकर, अलका शहा, सुनंदा साठे, युवती शहराध्यक्ष दीपाली साधू, माजी अध्यक्ष प्रियांका साळुंखे, उपाध्यक्ष सविता सावंत, फरीदा चाऊस, जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पाटील, शैलजा जाधव, माजी नगरसेविका संगीता कांबळे, साधना ताटे, मंदाकिनी चव्हाण, अंजना चव्हाण, ज्योती चव्हाण, गीता पाटील, रुपाली पाटील यांच्यासह शहरातील माजी नगरसेविका, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां या प्रचार दौर्‍यात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी काही भागात महिलांच्या घरगुती बैठकाही घेण्यात आल्या.
पुष्पलता खरात म्हणाल्या, राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपा युतीला मोठा झटका दिला आणि त्यांना लाडकी बहीण आठवली. महिलांना एका हाताने पंधराशे रुपये दिले आणि दुसर्‍या बाजूने तेल, डाळी, स्टँप आदी दर वाढविले आहेत. राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? लाडकी बहीण योजनेस आमच्या स्वाभिमानी महिला भुलणार नाहीत. तिच्या रोजगार, आरोग्य, शिक्षणाबद्दल सरकारने व विरोधकांनी काय केले?

COMMENTS