Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरातील स्फोटात 9 जणांचा मृत्यू

दारूगोळा बनवणार्‍या कारखान्यात स्फोट

नागपूर : नागपूरच्या बाजारगावमध्ये एक्सप्लोझिव्ह निर्मिती करणार्‍या एका फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 म

स्वा.सावरकर उद्यानात अमृतवन परिवाराचे झेंडावंदन
कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी
शहर व तालुका बंद आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद

नागपूर : नागपूरच्या बाजारगावमध्ये एक्सप्लोझिव्ह निर्मिती करणार्‍या एका फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरूषांचा समावेश आहे. तर काही जण आत अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात हा स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट झाला आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. या कंपनीत संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार केली जातात, अशी माहिती आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते. युवराज चोराडे, ओमेश्‍वर मछिर्के, मिता उईके, आरती सहारे, श्‍वेताली मारबते, भाग्यश्री लोणारे, रुमीता विलास उईके, मोसम पटले अशी या स्फोटात मरण पाललेल्या मृतांची नावे आहेत.  मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. तर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी आमदार अनिल देशमुख दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदेेंकडून 5 लाख मदतीची घोषणा – नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत

COMMENTS