Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

पाटोदा वार्ताहर - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद

वसंतदादा पाटील महाविद्यालयाचा अनिल खेडकर करणार युवा संसदेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व
वसंतदादा पाटील महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार संपन्न
वसंतदादा पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पाटोदा वार्ताहर – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य व क्रीडा विभागप्रमुख प्रोफेसर किशोर मचाले, उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. विनोद पवार, डॉ. तानाजी आगळे, ग्रंथपाल प्रा. जगन्नाथ पटाईत, प्रा. विनोद गायकवाड, प्रा. रवी जोगदंड, प्रा. प्रदीप मांजरे आदि उपस्थित होते.  प्रास्ताविकात प्रोफेसर किशोर मचाले म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांचा जन्म 1905 मध्ये झाला. त्यांना  बालपणापासून अभ्यासापेक्षा खेळामध्ये जास्त रुची होती. मेजर ध्यानचंद हे 1922 मध्ये सैन्यदलात दाखल झाले. तिथे त्यांना भोला तिवारी यांनी हॉकी खेळण्यात प्रेरित केले. 1932 साली लॉस एंजेलिस येथे भारतीय टीमने  24 गोल केले त्यापैकी ध्यानचंद यांनी 8 गोल केले होते. त्यांनी भारतास सात वेळा ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकून दिले. लोक त्यांना हॉकीचे जादूगार म्हणत असत. त्यांनी केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. आभारप्रदर्शन डॉ. तानाजी आगळे यांनी केले.

COMMENTS