Nashik : दुचाकी – कारचा भीषण अपघात…संतप्त जमावाने गाडी पेटवली (Video)

Homeव्हिडीओ

Nashik : दुचाकी – कारचा भीषण अपघात…संतप्त जमावाने गाडी पेटवली (Video)

नाशिकमध्ये कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्यानंतर मोटरसायकलसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला. या अपघातात एका तर

पाथर्डी आगारातून सत्तर दिवसांनंतर धावली लालपरी
मुंबईच्या तुलनेत इतर शहरांतील घरं झाली महाग! l LokNews24
राजधानीत प्रदूषणामुळे पाचवीपर्यंतच्या शाळांना सुटी

नाशिकमध्ये कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्यानंतर मोटरसायकलसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडी पेटवून दिली.हा अपघात इतका भीषण होता, की अपघातात नाशकातील डाक बंगला परिसरात राहणाऱ्या करण मनोहर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

COMMENTS