शिक्रापूर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथे एक जानेवारी 2026 रोजी 208 व शौर्यदिन साजरा होत असताना विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी थेट उ

शिक्रापूर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथे एक जानेवारी 2026 रोजी 208 व शौर्यदिन साजरा होत असताना विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी थेट उत्तर प्रदेश हून मुस्लिम आल्याचे दिसून आले.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील विजयस्तंभ येथे एक जानेवारी 2026 रोजी 208 व शौर्य दिन साजरा होत असताना देशभरातून अनेक समाज बांधव लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आलेले असताना उत्तर प्रदेश येथील आजमगड येथून काही मुस्लिम बांधव हाती निळे ध्वज घेऊन अभिवादन करण्यासाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करत अभिवादन बाबत बोलताना आपण तीन वर्षांपसून येथे येत आहे. पुढील वर्षी आपण कुटुंबियांसोबत मोठ्या संख्येने येणार असल्याचे मोहम्मद अदनान यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा : विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उत्तर प्रदेश हून आलेले मुस्लिम बांधव

COMMENTS