Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई गोवरचा उद्रेक, आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गोवर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत गोवरमुळे 10 बालकांचा

पिकअप-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू l LOK News 24
फटाके लावताना भाजपचे माजी आमदार तोंडावर पडले
*Exclusive Interview : गर्भवती महिलांनी कोरोना संसर्गात घ्यावयाची काळजी व लसीकरणाबद्दलचे समज-गैरसमज | LokNews24*

मुंबई : राज्यात गोवर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत गोवरमुळे 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर -मुंबई पाठोपाठ नाशिक शहरात देखील गोवरचे 4 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.  
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी मंत्रालयात यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. गोवंडी इथं एका सव्वा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोवरच्या संशयित मृतांची संख्या 10 झाली आहे. यातील एक मृत्यू मुंबईबाहेरील भिवंडी इथला आहे. गोवंडी येथे एका सव्वा वर्षांच्या मुलीला 3 नोव्हेंबरला ताप आणि खोकला सुरू झाला. 5 नोव्हेंबरला तिच्या अंगावर पुरळ दिसू लागले. 11 नोव्हेंबरला तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. काल मुंबईमध्ये 24 नवे रुग्ण आढळून आले आहे. मुंबईच्या गोवंडी विभागात सर्वाधिक 6 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल कुर्ला 5, अंधेरी पूर्व 3, प्रभादेवी, गोरेगाव आणि कांदिवली या विभागामध्ये प्रत्येकी दोन, तर भायखळा, माटुंगा, भांडुप, चेंबूर विभागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रुग्णांची संख्या 208 झाली आहे. दरम्यान, मुंबई मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरात देखील गोवरचे 4 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या 4 संशयित बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढला असल्यामुळे आरोग्य विभाग अलर्टवर आहे. रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य विभाग शहरात सर्वेक्षण करणार आहे.

COMMENTS