Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकाला सुनावले

नागपूर/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये 20 टक्के कर्नाटकी नागरिक राहतात, त्यामुळे मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटच्या शिक्षणम

“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही”
सामान्य माणसाला भयमुक्त व सुरक्षिततेचे ठिकाण वाटेल असे काम करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जलयुक्त शिवारातून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण

नागपूर/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये 20 टक्के कर्नाटकी नागरिक राहतात, त्यामुळे मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटच्या शिक्षणमंत्र्यांनी केले होते. त्याचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्याही बापाची नाही आणि त्याच्यावर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कर्नाटक सरकारला सुनावले.

कर्नाटकच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे. अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली जाईल असे सांगत मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, या कर्नाटकच्या मंत्र्याच्या वक्तव्याचा निषेधही फडणवीस यांनी विधिमंडळात केला. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध करत सीमाप्रश्‍नाला चुकीचे वळण देण्याचे आणि सीमावासीयांच्या भावनेला ठेच पोहचवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. कर्नाटक सरकारची ही माहीती केंद्र सरकार पर्यंत पोहचवावी, अशी मागणी केली. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती तेव्हा दोन्ही राज्यांनी मान्य केले होते की, नव्याने दावे केले जाणार नाहीत. महाराष्ट्राने ठराव करताना सर्वोच्च न्यायालयात जो दावा आहे, त्यानुसारच ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी जे दावे केले आहेत ते बैठकीशी विसंगत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

टीईटी घोटाळयाची होणार उच्चस्तरीय चौकशी – राज्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रचा चाचणी घोटाळा उजेडात आल्यानंतर याप्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचे नावे देखील समोर आली होती. त्यानंतर सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सव प्रकरणात 15 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्यानंतर माहिती अधिकारातील कागदपत्रानुसार सत्तार यांची कन्या टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसतांना देखील सेवेत कसे कायम करुन घेतले, याप्रकरणी सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी विरोधकांनी विधिमंडळात घेरल्यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. याबाबत अधिक माहिती अशी की,शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणात शिंंदे गटाचे आमदार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याने विरोधकांनी यावर जोरदार टीका केली होती.

COMMENTS