Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्पर्धेतूनच बहुआयामी व्यक्तीमत्व घडते ः डॉ. महेंद्र चितलांगे

कोपरगाव प्रतिनिधी ः स्पर्धेतील यश अपयश महत्वाचे नसुन स्पर्धेत भाग घेणे म्हणजेच आत्मविश्‍वास प्रदर्शित करणे असा आहे. स्पर्धेत भाग घेणार्‍या  सर्वच

कामगारांनीही माथाडी मंडळात लेव्ही भरणा करावा
खा. लोखंडेंनी मानहानीचा दावा करून आपली स्वच्छ प्रतिमा का सिद्ध केली नाही ?
jalgaon : कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल श्रीमद यांचा सत्कार l LokNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः स्पर्धेतील यश अपयश महत्वाचे नसुन स्पर्धेत भाग घेणे म्हणजेच आत्मविश्‍वास प्रदर्शित करणे असा आहे. स्पर्धेत भाग घेणार्‍या  सर्वच स्पर्धकांचा आत्मविश्‍वास हा त्यांना या महाकाय विश्‍वातील वेगवेगळी आव्हाने पेलण्यासाठी पुरक ठरतो. स्पर्धेतुन बहुआयामी व्यक्तिमत्व घडते. म्हणुन सध्याच्या काळात केवळ गुण पत्रिकेवरील गुण महत्वाचे नसुन स्वतःमधिल विविध कौशल्येही तितकीच महत्वाची आहेत. म्हणुन विध्यार्थ्यांनी  केवळ गुणार्थी न होता बहुआयामी व्यक्तिमत्व घडवावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळाचे (एमएसबीटीई) सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी केले.
संजीवनी के.बी. पी. पॉलीटेक्निकने रोटरी क्लब कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयएसटीई स्टुडन्टस् चाप्टर अंतर्गत आयोजीत केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक परीसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. चितलांगे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुपऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी या उद्घाटन सोहळ्याचे  अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रलचे अध्यक्ष  विरेश अग्रवाल, सचिव ए. डी. अंत्रे, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, संजीवनी डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, प्राचार्य ए. आर. मिरीकर, समन्वयक प्रा. डी. ए. पाटील, आयएसटीई स्टुडन्टस् चाप्टरच्या प्रमुख प्रा. एस. सी. भंगाळे, सर्व विभाग प्रमुख व डीन्स व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी पॉलीटेक्निकच्या प्रगतीचा आलेख मांडला. यावेळी बोलतांना अमित कोल्हे यांनी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमता सिमित करू नये. जर तुम्ही विचार केला की तुम्ही करू शकता, तर एखादी गोष्ट  तुम्ही निश्‍चितच  करू शकता, या उलट तुम्ही जर असा विचार केला की तुम्ही नाही करू शकत, तर तुम्ही नाहीच करू शकणार. म्हणुन सकारात्मक विचार हाच आपणास प्रगतीकडे घेवुन जाईल. पॉलीटेक्निकच्या दुसर्‍या वर्षातील संस्कृती पाटील व आकांक्षा मुठे यांनी अस्खलीत इंग्रजी मधुन सुत्रसंचलन केले. त्यांच्या या सुत्रसंचालनाचे कौतुक करीत डॉ. चितलांगे यांनी त्या दोघींचाही सत्कार केला. प्रा. पाटील यांनी आभार मानले.

COMMENTS