Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औताडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पोहेगावात नागरी सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी ः सहकार सामाजिक बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  पोहेगाव येथील भूमिपुत्र उत्तमराव पंढरीनाथ औताडे यांना 2022 चा आ

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून सर्व प्रभागात वृक्षारोपण
पढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान
१०० सेकंदात १५ ठळक बातम्या | सुपरफास्ट महाराष्ट्र | Marathi News | LokNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः सहकार सामाजिक बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  पोहेगाव येथील भूमिपुत्र उत्तमराव पंढरीनाथ औताडे यांना 2022 चा आयकॉन पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्याने पोहेगाव परिसरातून त्यांचे कौतुक झाले काल ग्रामस्थांनी एकत्र येत चंद्रपंढरी पतसंस्थेच्या सभागृहात त्यांचा नागरी सत्कार केला.
यावेळी एम टी रोहमारे, काळे कारखान्याचे माजी संचालक सचिन रोहमारे, संचालक प्रवीण शिंदे, गंगाधर औताडे, मधुकर औताडे, संजय रोहमारे, भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब औताडे,शरद नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे, गौतम बँकेचे संचालक सुरेश भालेराव, उत्तम भालेराव, राजेंद्र औताडे,  बाबासाहेब सोनवणे, नितीन शिंदे, वाल्मीक नवले, निलेश औताडे, योगेश औताडे, गोरख भालेराव, तुकाराम जाधव, कैलास औताडे, नंदकिशोर औताडे, योसेफ भालेराव, किरण भालेराव, कैलास गुडघे अदी उपस्थित होते.यावेळी एम टी रोहमारे व उत्तम भालेराव यांनी सांगितले की औताडे यांना मिळालेला पुरस्कार नक्कीच पोहेगावच्या वैभवात भर घालणारा आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी सातत्याने जनसेवेचे वृत्त हाती घेतल्याने हा पुरस्कार त्यांना मिळाला. सामाजिक सहकार क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास आहे असे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना उत्तमराव औताडे म्हणाले की पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते. गावात माझा जो सत्कार झाला त्यामुळे निश्‍चित मला ऊर्जा मिळाली. समाजासाठी नेहमी काम करत राहील असे आश्‍वासन त्यांनी दिले.सूत्रसंचालन राजेंद्र औताडे यांनी केले तर आभार नंदकिशोर औताडे यांनी मानले

COMMENTS