Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गाचे निघाले टेंडर

शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता जमिनींना योग्य भाव देण्याची मागणी

राहुरी प्रतिनिधी ः बहुचर्चित सुरत-नाशिक-हैदराबाद ग्रीनफिल्ड हायवे महामार्गाचे नुकतेच कामाचे टेंडर प्रसिद्ध झाले असून नगर जिल्ह्यातील 1 हजार 513 क

आझादी का अमृत महोत्सव निमित्त कायदेविषयक जनजागृती रॅलीचे उद्घाटन
नागरिकांनी रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर जिल्हा परिषद शाळेला खुर्च्या भेट

राहुरी प्रतिनिधी ः बहुचर्चित सुरत-नाशिक-हैदराबाद ग्रीनफिल्ड हायवे महामार्गाचे नुकतेच कामाचे टेंडर प्रसिद्ध झाले असून नगर जिल्ह्यातील 1 हजार 513 कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर निघाले असल्याचे सोशल मीडियावर झळकत असून 26 फेब्रुवारीपर्यंत याची मुदत असल्याचे नमूद झाले आहे. या मार्गासाठी देण्यात येणार्‍या शेतकर्‍यांचा जमिनींना योग्य भाव दिल्याशिवाय पुढील काम होऊ देणार नसल्याची शेतकर्‍यांची भूमिका मात्र कायम आहे.
सुरत-नाशिक-नगर-सोलापूर-हैदराबाद-चेन्नई ग्रीन फिल्ड हायवे रस्त्याची महामार्गाची 2018 ला अधिसूचना जारी होऊन टप्प्याटप्प्याने त्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सुरुवातीला या रस्त्याच्या कामाची जणू अफवा असल्याचे बोलले जात होते. सोशल मीडियावर तशा विविध पोस्ट येत होत्या, मात्र जेव्हा नगर येथे राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.ए. आय.इंडिया)चे कार्यालय नगरला थाटण्यात आले आणि नगर, राहुरी, संगमनेर, राहाता तालुक्यातील शेतकरी जागरूक होत, या महामार्गाला विरोध करत योग्य मोबदला जाहीर झाल्याशिवाय आमच्या जमिनी देणार नसल्याचे धोरण घेत विरोध सुरू झाला. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरत-हैदराबाद रस्त्याच्या चिंचोली गुरव (तालुका- संगमनेर) ते मोमीन आखाडा (राहुरी तालुका) या 55 किलोमीटर अंतरावरील सहा पदरी हायवेच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाल्याचे सोशल मीडियावर वारंवार फिरत आहे, अर्थात व्हायरल झाले आहे. 1 हजार 513 कोटी 20 लाख रुपयांचे हे कामाचे टेंडर असून त्याची मुदत 26 फेब्रुवारी 2024 पर्यंतची आहे. हे टेंडर सेंट्रल पब्लिक पोर्टलवर प्रसिद्ध झाल्याची ही सांगितले जाते. दुसर्‍या टप्प्यातील मोमीन आखाडा ते मांजरसुंबा या 25 किलोमीटर अंतराचे टेंडर आहे तर मांजरसुंबा ते सारोळा बद्दी या 20 किलोमीटर अंतराचे देखील टेंडर निघाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. समृद्धी महामार्गप्रमाणे सुरत-हैदराबाद या ग्रीनफिल्ड हायवेसाठी योग्य तो मोबदला देण्यात यावा, अशी शेतकर्‍यांची मागणी कायम आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकर्‍यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. आता टेंडर निघाल्याच्या व्हायरल चर्चेमुळे शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता वाढले असून एनएचएआयने याबाबत योग्य तो खुलासा करावा व मोबदल्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

COMMENTS