निंबळकला रविवारी नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निंबळकला रविवारी नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलन

अहमदनगर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समिती, इसळक- निंबळक यांच्यातर्फे नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रा

खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे
डॉ. शुभम कांडेकर आणि चैतालीताई खटी पुरस्कार
मंत्र्यांवर आंदोलनाची वेळ, हे दुर्दैव ; प्रा. शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका ; 26 जूनला चक्का जाम जाहीर

अहमदनगर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समिती, इसळक- निंबळक यांच्यातर्फे नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या रविवार दि. 26 जून 2022 रोजी निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरी येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. योगेश गेरंगे यांनी दिली.
या संमेलनाध्यक्षपदी मराठीतील समीक्षक, संशोधक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांची निवड यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी रामदास कोतकर यांच्यावर आहे. संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार सुधीर तांबे, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, मसापचे नगर शहर अध्यक्ष किशोर मरकड उपस्थित राहणार आहेत.

साहित्यिक उपक्रमांची मांदियाळी
रविवारी सकाळी साडे आठ वाजता ग्रंथ सन्मान मिरवणुकीने या संमेलनास सुरुवात होणार आहे. दत्त मंदिर चौक ते श्री क्षेत्र धरमपुरी या मार्गाने ही मिरवणूक जाईल. सकाळी साडे नऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. दुसर्‍या सत्रात ‘राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य’ या विषयावर सामजिक अभ्यासक आनंद शितोळे यांचे व्याख्यान होणार आहे. संमेलनात ‘सध्याच्या काळात साहित्यिकांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. महेबूब सय्यद असतील. तर, प्रा. डॉ. बाळासाहेब पवार आणि पत्रकार सुधीर लंके हे संवादक या विषयाची मांडणी करणार आहेत. परिसंवादाच्या सत्रानंतर कवी संमेलन होईल. या सत्राचे अध्यक्षपद प्रसिद्ध कवी संतोष पद्माकर पवार भूषविणार आहेत. कवी संमेलनानंतर समारोप सत्र होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी समितीचे उपाध्यक्ष राहुल ठाणगे, सचिव संदीप गेरंगे, मच्छिंद्र म्हस्के, ज्ञानेश्‍वर गव्हाणे, संतोष घोलप, दिगंबर डहाळे, विनायक कोतकर, राजेंद्र खुंटाळे, सुनील जाजगे, राम बोराटे, सुरज धामी, ज्ञानेश्‍वर आजबे प्रयत्नशील आहेत.

नावनोंदणी आवश्यक
या साहित्य संमेलनातील कवी संमेलनात सहभागी होणार्‍या कवींनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नगर तालुक्यासह इतर भागातील कवींनी अधिकाधिक संख्येने संमेलनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन समिती उपाध्यक्ष राहुल ठाणगे यांनी केले आहे. नाव नोंदणीकरिता योगेश गेरंगे (मो.नं. 9404977723) आणि राहुल ठाणगे (मो. नं. 7040144341) या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS