Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली खा. शरद पवारांची भेट

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसमधे उभी फूट पडल्यानंतर आणि अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँगे्रसवर दावा केल्यानंतर दोन्ही गटामध्ये तणाव नसल्याचेच दिसून

ओबीसी आरक्षणासाठी लढणार्‍यांना धमक्या ; मंत्री वडेट्टीवार यांचा आरोप
ज्येष्ठ काँग्रेस नेते किरण रेड्डींचा भाजपमध्ये प्रवेश
श्रीलंकेने पटकावले विश्‍वचषक पात्रता फेरीचे विजेतेपद

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसमधे उभी फूट पडल्यानंतर आणि अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँगे्रसवर दावा केल्यानंतर दोन्ही गटामध्ये तणाव नसल्याचेच दिसून आले आहे. कारण शुक्रवारी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. या भेटीनंतर वळसे-पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ही पूर्वनियोजीत भेट होती. रयत शिक्षण संस्थेतील काही अडचणींबद्दल अध्यक्ष शरद पवारांबरोबर चर्चा झाली. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील अन्य पदाधिकारीही होते. यावेळी अन्य कुठलीही चर्चा झाली नाही. अशा भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, याबद्दल प्रश्‍न विचारल्यावर वळसे-पाटलांनी म्हटले, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. वसंतदादा शुगर, रयत शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य कारखाना आणि राष्ट्रीय कारखाना संघ या संस्थांवर मी काम करतोय. येथे काम करताना नेहमीच शरद पवारांचे मार्गदर्शन घेत आलो आहे. आज सहकारी संस्थांचे प्रश्‍न, दुष्काळी परिस्थिती संदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजना याबद्दल शरद पवारांशी चर्चा केली.

COMMENTS