तीनही कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीनही कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

केंद्र सरकारचे तीन काळे कृषी कायदे तसेच इंधनाचे वाढलेले दर याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे.

पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना 
परशुराम जयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी: केंद्र सरकारचे तीन काळे कृषी कायदे तसेच इंधनाचे वाढलेले दर याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. राज्यातदेखील ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईसह राज्यभरात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की केंद्र सरकारचे तीन काळे कृषी कायदे, इंधनाचे वाढलेले दर याविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. आज देशात बंदची हाक असताना पंतप्रधान विदेश वारीवर आहेत. दिल्ली सीमेवर आंदोलनात 300 पेक्षा जास्त शेतकरी मरण पावले आहेत. आपले पंतप्रधान निगरगट्ट झाले आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना शेतकर्‍यांशी चर्चा करायला पाठवतात, ज्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही. अशी चेष्टा केंद्र सरकारने शेतकर्‍यांची चालवली आहे. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी आमची मागणी आहे. विरोधकांशी चर्चा करून नवीन कायदे करावेत. सध्या हे कायदे दीड वर्षासाठी स्थगित केले आहेत. आमची मागणी आहे चर्चा करून नवीन कायदे करा; पण यांना कृषी अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायची असल्याने मोदी सरकार हे करणार नाही. कोरोना काळात सरकारला झालेला तोटा भरून काढण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेलवर भरमसाठ कर आकारत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत; मात्र आपल्या देशात किंमती कमी होत नाहीत.

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सोलापुरात आंदोलन झाले. संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी माकपने जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आंदोलन करायचे ठरवले होते; मात्र आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. दुसरीकडे काँग्रेसतर्फे कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. सोलापुरातील काँग्रेस भवनसमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलन स्थळी गॅस सिलेंडरची मोठी प्रतिकृती लावून इंधनाचे दर कशा प्रकारे वाढले हे दाखविण्यात आले. पाटील यांनी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, इंधनाचे वाढलेले भरमसाठ दर कमी करावेत अशी मागणी करत केंद्राच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला. 

चिपळूणमध्ये उपोषण

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात आज चिपळूणमध्ये काँग्रेसकडून उपोषण करण्यात आले. चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव तसेच काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले.

COMMENTS