Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मढी येथे आज भटका जोशी समाजाचा मेळावा – राजेंद्र जोशी

कोपरगाव प्रतिनिधी : अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या वतीने शुक्रवार (दि.17) मार्च रोजी भटक्याची पंढरी समजल्या जाणार्‍या चैतन्य कानिफनाथ महाराज य

काकडे महाविद्यालयात अविष्कार संशोधन स्पर्धेत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर
शिर्डी रामनवमी उत्सवानिमित्त प्रथमच दोन अध्यक्षांची निवड
अहमदनगर शहरात होणार आणखी तीन नवे उड्डाण पूल

कोपरगाव प्रतिनिधी : अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या वतीने शुक्रवार (दि.17) मार्च रोजी भटक्याची पंढरी समजल्या जाणार्‍या चैतन्य कानिफनाथ महाराज यांचे पवित्र स्थान असणार्‍या श्री क्षेत्र मढी ता.पाथर्डी येथे राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जोशी यांनी दिली आहे.
या मेळाव्यात संपुर्ण भटक्या खिवारी भाषीक जातीचा एक संघटन तयार करणे, खिवारी भाषीक एनटीबी समुहाचं एक संघटन तयार करण्यामागील उद्दिष्ट व भुमिका स्पष्ट करणे, भटक्या जमातीला राजकीय आरक्षण तसेच स्वतंत्र जातनिहाय जनगणना होणे बाबत तसेच भटक्या समुहातील उत्कृष्ट काम करणार्‍या व्यक्तीचा संघटनेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करणे आदी विषय घेण्यात येणार आहे. तरी भारतीय भटका विमुक्त जाती जमातीचे सर्व समाज बांधवांनी या राज्यव्यापी मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे  जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जोशी,बाबासाहेब वाघडकर, जिल्हा युवक अध्यक्ष, अहमदनगर, बाबासाहेब महापुर राज्य सचिव, सोपान महापुर राज्य युवक कार्याध्यक्ष यांनी केले आहे.

COMMENTS