Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी योग्य माणसाला संधी द्या ;-शुभांगी पाटील

पाथर्डी प्रतिनिधी- मला कुठलाही राजकीय वारसा नाही मी संघर्षातून पुढे आले आहे.ज्याची योग्यता आहे त्याला संधी मिळायाला हवी.परंतु डोळ्यावर पट्टी

ट्विटरवर संमतीशिवाय इतरांचे फोटो शेअर करता येणार नाही | DAINIK LOKMNTHAN
मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल l LokNews24
‘त्या’ तरुणीने विषारी औषध घेवून केला आत्महत्येचा प्रयत्न

पाथर्डी प्रतिनिधी- मला कुठलाही राजकीय वारसा नाही मी संघर्षातून पुढे आले आहे.ज्याची योग्यता आहे त्याला संधी मिळायाला हवी.परंतु डोळ्यावर पट्टी बांधून कोणालाही संधी दिलेली आम्ही सहन करणार नाही.म्हणून मातोश्रीला आणि महाविकास आघाडीला शब्द देत निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे.६० वर्षांत पहिल्यादा एका महिलेने पदवीधर निवडणुकीत अर्ज भरला आहे.ज्यांनी इतक्या दिवसाचा शब्द मोडला त्यांच्यापेक्षा माझ्या दोन दिवसांचा शब्द फार मोठा असेल.मला माझं स्वतःचं एक मत पडलं तरी चालेल पण कोणत्याही अमिषाला बळी न पडता स्वाभिमानाने निवडणुक लढेल.

           नाशिक पदवीधर विधानपरिषदेच्या उमेदवार शुभांगी पाटील एम.एम.निऱ्हाळी विद्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आणि पदवीधर मतरदारांची बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अड प्रताप ढाकणे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसनेचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे,काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद सानप,महिला तालुकाध्यक्ष सविता भापकर,माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले,आरती निऱ्हाळी,माजी नगरसेवक बंडू बोरुडे,हुमायुन आतार योगेश रासणे आदी जण उपस्थित होते.

       पुढे बोलताना शुभांगी पाटील यांनी म्हटले की,पाथर्डी तालुक्यात दोन नंतर काम करण्यासाठी यावं लागेल अशी उमेद मला तुमच्या विश्वासातून वाटते.मी एम पी एस मेरिट मध्ये होते तेव्हा आयुष्यात एक घटना जीवनाला कलाटणी देऊन गेली तेव्हा पासून माझ्या पदवीधरांसाठी आणि शिक्षकांसाठी जगण्याचे निश्चित केले.त्यानंतर शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना सुशिक्षित बेरोजगारी एवढी फोफावली गेली होती.चांगले चांगले मुलं कामाला जाताना पाहून त्यांच्या पदभरतीसाठी लढण्याचा विचार करत घराच्या बाहेर पाऊल टाकले.खेडोपाडी ग्रंथालय असून चालणार नाही.यूपीचा नाही तर महाराष्ट्रातील मुलगा यूपीएससीच्या माध्यमातून अधिकारी झाला पाहिजे.लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जगल पाहिजे म्हणून घराच्या बाहेर पडले आहे.ज्यांनी पदवीधराना गृहीत धरलं ते पदवीधर काम करणाऱ्या व्यक्तीला संधी देतील अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS