Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात मविआला 30-35 जागा मिळतील

खासदार शरद पवारांना विश्‍वास

सातारा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे करण्यात येत असतांना खासदार शरद पवार यांनी राज्यात मह

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
नागपूर विधानभवनावर धडकणार राष्ट्रवादीचा मोर्चा

सातारा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे करण्यात येत असतांना खासदार शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीला 30-35 जागा मिळतील असा विश्‍वास व्यक्त केला आहे. खासदार पवार सातार्‍यातील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, देशात तीन टप्प्यात झालेले मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. लोक भाजपपासून दूर जात असल्याची त्यांना जाणीव झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील, असा विश्‍वास पवारांनी व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला एक, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि एमआयएमला 1 अशा 6 जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. पंरतु, या निवडणुकीत आम्हा लोकांची संख्या 30 ते 35 वर जाईल. लोकांना बदल हवा आहे. लोकांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला समर्थन मिळत आहे. देशात पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक संपल्यानंतर मोदींनी आपला स्वर बदलला. यानंतर त्यांनी मुस्लीम समाजाचा उघडपणे उल्लेख केला. मोदींना असे वाटत असावे की, धर्मांध विचार घेऊनच मदत होऊ शकते. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात आहे, तसेतसे मोदींचे स्थान संकटात जात आहे, अशी भावना भाजप नेत्यांमध्ये असावी, असे माझे निरीक्षण असल्याचे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांना सभा घ्यायला लावत आहात, त्यांना आराम द्या, तुम्ही प्रचार करा, असे अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना सुनावले होते. त्यावर शरद पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मला कोणी त्रास देत नाही. सगळेजण माझ्यासोबत प्रेमाने वागतात. आमची सगळ्यांची पडेल ते कष्ट घेण्याची तयारी आहे, असे शरद पवार म्हणाले.

COMMENTS