Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांसह अनेकांना अडकवण्याचा ’मविआ’ कट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः नुकतेच फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट दिल्यानंतर राजकारण तापले असून, भाजप नेते देवेंद्

शिवसेना कुणाची होणार लवकरच फैसला निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू
महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट
भाजप-शिंदे सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब

मुंबई/प्रतिनिधी ः नुकतेच फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट दिल्यानंतर राजकारण तापले असून, भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना तुरूंगात डांबण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात खोटे आरोप करत यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनत्तथ शिंदे यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीबीआयने रश्मी शुक्ला प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. मग त्यावेळी झालेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे म्हणायचे का? आघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर आरोप करून खटला भरण्यात आला होता? याप्रकरणावर बोलतांना मख्यमंत्री शिंदे म्हणाले की, याआधीच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात खासदार नवनीत राणा, केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन तसेच अभिनेत्री कंगना रनौट यांच्यावर खोटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडकविण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. याची मला देखील चांगली माहिती आहे. परंतू सत्तेचा व यंत्रणेचा सर्रासपणे गैरवापर ठाकरे सरकारच्या काळात झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी खोटे आरोप करून अनेक बड्या नेत्यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्लॅन केला गेला. यात महाजन, राणा, नारायण राणे यांचा देखील समावेश होता. यांच्यावर खोटे आरोप करून तुरूंगात डांबण्यांचा कट रचला गेला होता. पण सीबीआयने तपास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकले. हे सर्व राज्यातील जनता बघत आहे. कोण काय करू लागले आहे. येत्या काळात जनताच त्यांना धडा शिकवेल. त्या काळात यंत्रणेचा दुरूपयोग करत होते. आज कोण कोणावर आरोप करत आहे. ही बाब उघड झाली आहे. याचा विचार देखील सुज्ञ जनता करत आहे. त्यामुळे योग्यवेळी त्यांना उत्तरे दिली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी विरोधकांना दिला.

COMMENTS