Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयाननिमित्त राष्ट्रीय अंतराळ दिनाची घोषणा  

इस्त्रोंच्या शास्त्रज्ञांची भेट घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक

नवी दिल्ली/प्रतिनिधी : चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतामध्ये अजूनही जल्लोष सुरू असून, यातून आपल्या युवा पिढीला निरंतर प्रेरणा मिळावी याक

शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…
राष्ट्राचे रक्षक समर्पणाने जीवन उजळून टाकतात
डॉ. आंबेडकरांचे कार्य कधीही विसरता येणार नाही : पंतप्रधान

नवी दिल्ली/प्रतिनिधी : चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतामध्ये अजूनही जल्लोष सुरू असून, यातून आपल्या युवा पिढीला निरंतर प्रेरणा मिळावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्टला जेव्हा भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला त्या दिनाला भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस रुपाने साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर ज्या स्थानावर चांद्रयान-3 चे मून लँडर उतरले आहे. त्या पॉईंटला शिवशक्ती या नावाने ओळखले जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच चंद्रयान-2 ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेले होते. त्या पॉइंटला तिरंगा हे नाव दिले जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली

ब्रिक्स परिषद आणि दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी मायदेशी परतल्यानंतर त्यांनी प्रथम इस्रोच्या मुख्यालयात पोहोचून चांद्रयान-3 मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. यावेळी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी दक्षिण आफ्रिकेत होतो. पण माझे मन तुमच्याकडे लागून राहिलेले होते. तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक होतो. इस्रो सेंटरमध्ये आल्यावर मला वेगळाच आनंद वाटत आहे. भारतात येऊन लवकरात लवकर तुमचे दर्शन घ्यायचे होते. तुम्हा सर्वांना मी सॅल्यूट करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तुम्ही ही चांद्रयान मोहीम यशस्वी केली ही साधी गोष्ट नाही. तुम्ही चांद्रयान मोहीम यशस्वी केली ही साधी गोष्ट नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. भारत आज चंद्रावर आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. हा आपल्या देशासाठी गौरवाचा क्षण आहे. जिथे कोणीच गेले नाही तिथे आपण पोहोचलो आहोत. कुणी केले नाही केले ते आपण केले. हा आजचा भारत आहे, निर्भिड भारत. नवे स्वप्न नव्या पद्धतीने पाहणारा हा भारत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतीय मुलांमध्ये आकांक्षाचे बीज रोवले – भारताची युवा पिढी तंत्रज्ञान, विज्ञानाने भारलेली आहे. त्यामागे आपल्या अशाच स्पेस मिशनचे यश आहे. मंगलायानचे यश, चांद्रयान मोहिमेचे यश, गगनयानामुळे देशाच्या युवा पिढीला नवा उत्साह मिळाला आहे. प्रत्येकाच्या तोंडी आज चांद्रयानाचे नाव आहे. भारतातील प्रत्येक लहान मूल वैज्ञानिकांमध्ये आपले भविष्य पाहत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त चंद्रावर तिरंगा फडकवला नसून तुम्ही एक मोठे यश प्राप्त केले आहे, ज्यामुळे भारताची संपूर्ण पिढी जागृत झाली आहे, त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. तुम्ही पूर्ण पिढीवर आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे, आज तुम्ही भारतीय मुलांमध्ये आकांक्षाचे बिज रोवले आहे, ते उद्या वटवृक्ष बनणार आहे असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

COMMENTS