नांदेड रस्त्यासाठी जनआक्रोश आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नांदेड रस्त्यासाठी जनआक्रोश आंदोलन

तातडीने रस्ता करण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी - छत्रपती चौक ते पुर्णा रस्ता आणि निळा ते वसमत रस्ता तातडीने करण्याची मागणीसाठी सर्वपक्षीय जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. मंजुर झालेला

जीएसटी उपायुक्तांह दोघांचा कामशेत बोगद्यात अपघाती मृत्यू
कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या
सखींनी जाणून घेतला सुदृढ आरोग्‍याचा मुलमंत्र

नांदेड प्रतिनिधी – छत्रपती चौक ते पुर्णा रस्ता आणि निळा ते वसमत रस्ता तातडीने करण्याची मागणीसाठी सर्वपक्षीय जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. मंजुर झालेला रस्ता स्थानिक आमदारांनी रद्द करुन पुन्हा नव्याने मंजुर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रस्त्याचे भुमिपुजन झाले मात्र चार महिण्यांपासून काम सुरू झाले नाही. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि धुळीमुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करुन ही हा सुरु केला जात नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. कांग्रेस, ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन करत तातडीने रस्त्याचे काम सुरू केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

COMMENTS