अहिल्यानगर : एमआयडीसी येथील नव नागापूर येथील रहिवासी,सशस्त्र सीमा बल,भारत नेपाळ सीमेवर तैनात हवालदार मेजर दत्तात्रय पांडुरंग रेडे हे सीमेवर कार्य
अहिल्यानगर : एमआयडीसी येथील नव नागापूर येथील रहिवासी,सशस्त्र सीमा बल,भारत नेपाळ सीमेवर तैनात हवालदार मेजर दत्तात्रय पांडुरंग रेडे हे सीमेवर कार्यरत असताना हृदय गती बंद पडल्यामुळे सीमेवरती शहीद झाले. त्यांचा अंत्यविधी शासकीय इंतमामामध्ये नागापूर, वैकुंठधाम,अहिल्यानगर येथे काल रात्री संपन्न झाला.
हेड कॉन्स्टेबल जेडी हवालदार दत्तात्रय रेडे हे सीमा सुरक्षा दल नेपाळ,भूतान बॉर्डर, छत्तीसगड ,बिहार येथे कार्यरत होते ते 51 वाहिनी सितामठी येथे कर्तव्य करीत असताना त्यांचे निधन झाले. 2005 साली सीमा दलामध्ये ते भरती झाले होते वयाच्या 41 व्या वर्षी ते शहीद झाले.सीमा सुरक्षा दलामध्ये 18 वर्षे त्यांनी नोकरी केली होती.नगर शिर्डी रोडवरील नव नागापूर येथील त्यांच्या निवासस्थाना पासून सजविलेला रथामधून तिरंगा ध्वज त्यांच्या पार्थिवावर टाकण्यात आला होता.तसेच पोलीस दलातील बिगुल वाजवून त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी बोल्हेगाव,नागापूर,नवनागपूर,एमआयडीसी व नगर शहरातील नागरिकांनी अंत्ययात्रेचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने शोकाकुल बांधव आणि भगिनी सहभागी झाले होते शहीद दत्तात्रय रेडे यांच्या पार्थिवावर नवनागापूर येथील स्मशानभूमी मध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस व सीमा संरक्षक दलातील पोलीस यांनी तीन राऊंड फायर करुन सलामी दिली.यावेळी सशस्त्र सीमा दलाचे अधिकारी असिस्टंट कमांडो पवन खराटे,पीएसआय विनोद परदेशी,सरपंच डॉ बबन डोंगरे,बंडू नाना सप्रे ,नायब तहसीलदार श्री वाढेकर,मेजर नीलकंठ वीर ,दीपक दुबळे, सीआरपीएफ मालाबादीचे श्री नागप्पा, जी सी पुणे ग्रुप सेंटरचे श्री विठ्ठल आदींसह मोठ्या संख्नेने नागरिक उपस्थित होते. शहीद दत्तात्रय रेडे यांच्या मागे वडील पांडुरंग रोडे,आई आशाबाई रेडे,पत्नी ज्योती रेडे,दीड वर्षाचा मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
COMMENTS