Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ

राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीची छापेमारी

सांगली/प्रतिनिधी : राज्यात काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छापेमारी चालू असून, ईडीने आतापर्यंत मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाची मोठ्या प्रमाणात आवक
जिल्हास्तरीय कुष्ठरोग निबंध स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील स्वप्नाली चव्हाण हिला प्रथम तर राहुल गडेराव याला द्वितीय पारितोषिक
टोप्यांच्या घरात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ

सांगली/प्रतिनिधी : राज्यात काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छापेमारी चालू असून, ईडीने आतापर्यंत मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी छापेमारी केली असून, यात अनेकांचे हात अडकण्याची शक्यता असतांनाच, ईडीने आपला मोर्चा सांगलीत जयंत पाटलांकडे वळवल्योच दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयांवर ईडीच्या अधिकार्‍यांनी छापेमारी केली आहे. सांगलीसह इस्लामपुरात ईडीने छापे मारले असून पश्‍चिम महाराष्ट्रातील 14 ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शंभर कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याशी संबंधित असलेल्या बँकांवर धाड पडल्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील एकूण 14 ठिकाणी ईडीच्या अधिकार्‍यांनी घाडी टाकल्या आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी बँकेचाही समावेश असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच बनावट कंपनीद्वारे कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत ईडीच्या अधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दोनवेळा चौकशी केली होती. याच प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट जयंत पाटलांशी संबंधित असलेल्या राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीने छापेमारी केल्याने पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

तो 100 कोटींचा व्यवहार रडारवर- राजारामबापू सहकारी बँकेच्या अनेक कार्यालयांमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले असून जूने कागदपत्र तसेच व्यवहारांची तपासणी केली जात आहे. 10 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपयांची रक्कम बँकेने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून रक्कम रोकड स्वरुपात वळती केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. हे संशयास्पद व्यवहार बँकेच्या अधिकार्‍यांनी लपवून ठेवल्याचा संशय ईडीच्या अधिकार्‍यांना आहे. त्यानंतर आता राजारामबापू सहकारी बँक आणि एका सीएच्याही कार्यालयात ईडीने छापेमारी केली आहे.

COMMENTS