Homeताज्या बातम्याशहरं

सिनेमा प्रदर्शनाच्या एक दिवस आधी मराठमोळ्या दिग्दर्शकाचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्व

जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू
मुंब्रा रेल्वे स्थानकाला मुंब्रा देवीचे नाव देण्यात यावे ; मनसेची मागणी 
जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन होऊन वर्ष झालं पण नागरिकांना पाहावी लागते पाण्यासाठी वाट

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट उद्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा क्षण अनुभवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आल्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे.

स्वप्नील मयेकर यांनी एक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा दिगदर्शित केला असून या सिनेमाचं नाव ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असं आहे. हा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार आहे. परंतु आदल्याच दिवशी स्वप्नील यांचे निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

COMMENTS