Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाचखोर पोलिस व्हाईस डिव्हाईस घेऊन पळाला गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः काळ्या बाजारात विक्री केला जाणारा तांदूळ प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलिस अ

आ. संग्राम जगतापांसह त्या पाच मुलांना मांडावे लागणार म्हणणे…
शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी
खिर्डी गणेशमध्ये बिबट्याचा संचार

अहमदनगर/प्रतिनिधी ः काळ्या बाजारात विक्री केला जाणारा तांदूळ प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलिस अंमलदाराने दुकानदाराकडे 50 हजार रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान सदरची लाच मागणी पडताळणी पंचासमक्ष सुरू असताना तो अंमलदार डिजिटल व्हाइस रेकॉर्डर घेऊन पसार झाला आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42) असे या अंमलदाराचे नाव आहे.

देहरे (ता. नगर) येथील तक्रारदारांच्या फिर्यादीवरून अंमलदार निपसे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, भादंवि 392, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सायंकाळी ही कारवाई केली. देहरे येथील तक्रारदार यांचे गावात किराणा दुकान आहे. ते किराणा सामान व धान्य विक्री करतात, तसेच गावातील काही लोक मुलांना शाळेत मिळालेला तांदूळ त्यांचे दुकानात आणुन विकतात. असा विकत घेतलेला तांदूळ ते नगर मार्केट यार्ड मधील एका व्यापार्‍याला विकतात. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी सदर मार्केट यार्ड येथील व्यापार्याच्या दुकानावर कोतवाली पोलिसांनी धाड टाकली होती. त्यांचेकडे काळ्या बाजारातील तांदुळ मिळून आल्याने गुन्हा दाखल केला होता व त्यास अटक केली होती.

अटके दरम्यान त्या व्यापार्याने तक्रारदार यांचेकडुन तांदूळ विकत घेतल्याचे सांगितलेवरून अंमलदार निपसे याने तक्रारदार व त्यांचे मुलास गुरूवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात बोलवून घेतले होते. त्यांचे मुलास या गुन्ह्यांमध्ये आरोपी न करण्यासाठी व अटक न करण्यासाठी 50 हजाराची मागणी केली. यासंदर्भात येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने गुरूवारी कोतवाली पोलीस ठाणे परिसरात पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, निपसे याने तक्रारदाराकडे  50 हजाराची मागणी केली, दरम्यान निपसेला तक्रारदार व पंच यांच्या बाबत संशय आल्याने, त्याने त्यांना एका खोलीत नेऊन दरवाजा बंद केला. त्यांची अंगझडती घेतली असता त्यास तक्रारदार यांचे कपड्यांचे आतमध्ये लपविण्यात आलेले डिजिटल व्हाइस रेकॉर्डर मिळुन आले. ते व्हाइस रेकॉर्डर निपसेने तक्रारदार यांचेकडून बळजबरीने हिसकावून घेऊन पोलिस ठाणे परिसरातून पळुन गेला आहे. तो मिळुन आला नाही, म्हणून त्यांचे विरूध्द शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक गोर्डे व त्यांच्या पथकातील अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, वैभव पांढरे, चालक हारून शेख यांनी ही कारवाई केली आहे.

COMMENTS