Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्रह्माकुमारी संस्थेच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा  

नाशिक - आपला परिचय संकुचित असला तर जीवनही संकुचित होत जाते आपला परिचय व्यापक असला पाहिजे. आपल्या जीवनाचे ध्येय व्यापक असले पाहिजे, जसे ज्ञानेश

आमदार होण्याच्या आधी माझं पाथर्डीशी नातं – आमदार निलेश लंके
चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा भीमसागर
बारामतीजवळ शिकाऊ विमान कोसळले

नाशिक – आपला परिचय संकुचित असला तर जीवनही संकुचित होत जाते आपला परिचय व्यापक असला पाहिजे. आपल्या जीवनाचे ध्येय व्यापक असले पाहिजे, जसे ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देवे असे सांगून आपले धेय्य वैश्विक बनविले आहे.  ध्येय हे उच्च असले तर तर जीवनही उच्च बनते.  असेच ध्येय सत्ययुगी  दुनिया स्थापन करण्याची आपण ठेवलेले आहे यातून उज्वल प्रभात निश्चित आहे अशा शब्दात त्रंबकेश्वरचे विवेकानंद ध्यान केंद्राचे अध्यक्ष श्री कलानंद जी स्वामी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक येथील प्रभू प्रासाद या वास्तूचा  नुकताच १५ वां वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  श्रीराम कृष्ण आरोग्य संस्थानचे संस्थापक कर्मयोगी संन्याशी स्वामी श्री कंठानंद महाराज,माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,संगमनेर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,माजी महापौर रंजना भानसी,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे,नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,त्रंबकेश्वर नगरसेवक कैलास चोथे, पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक ब्रह्मकुमारी मुख्य सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी आपल्या अध्यक्षीय संशोधनात सांगितले की आपल्याच शुभ संकल्पांनी सृष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे.  हे परिवर्तन म्हणजेच सद्गुणांचे साम्राज्य सृष्टीवर येणार आहे आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने हे शक्य होणार आहे. आपल्या या शुद्ध संकल्पनेच आपण सृष्टीचे परिवर्तन घडवून आणणार हा माझ्या मनात दृढ विश्वास आहे.

रावणाला संहारक व असुर दाखवण्यात आले आहे. मात्र या सोबतच असे म्हटले जाते की रावण हा विद्वान होता त्याच्याकडे सर्व शास्त्रांचे ज्ञान होते मात्र त्याच्या कर्मांमध्ये ती श्रेष्ठता येऊ शकली नाही यामुळे त्याचा नाश झाला. रावणाला दहातोंडे दाखवण्यात आले आहेत मात्र हे दहा तोंडे विकारांचे प्रतीक आहे मनुष्य मधील पाच विकार व  स्त्रीचे पाच विकर असे मिळून दशानंद रावण तयार झालेला आहे. अशा प्रकारे  रावण एक प्रतिकात्मक स्वरूप आहे.  आज या विकारांचे  साम्राज्य सर्वत्र पसरले आहे त्याच्यामुळे या पाच विकार रुपी रावणाचा नाश करण्यासाठी स्वयं श्रीरामरुपी निराकार शिव परमात्मा या धर्तीवर अवतरी झाले आहेत व निराकार शिव परमात्मा ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे विश्वामध्ये पवित्रतेची स्थापना करीत आहेत या पवित्र राम राज्याच्या स्थापनेतूनच रावण राज्याचे  नाश होणार आहे. असा दसऱ्याचा शुभ संदेश दीदी जी यांनी या प्रसंगी दिला. 

आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये मन:शांती ही काळाची गरज आहे हे सुंदररित्या कार्य प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या वतीने अविरत सुरू आहेत ब्रह्माकुमारी संस्थेचे  कार्या कौतुकास्पद,  सर्वांनी ब्रह्मा कुमारी संस्थेचा राजयोगा कोर्स करून घेऊन आनंददायी जीवन जगावे असे  प्रतिपादन माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले

कार्यक्रमात वाय सी एम ओ यु चे उपकूलपती संजीव सोनवणे यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या दिल्ली येथील कार्यक्रमाचे अनुभव सांगितले. कार्यक्रमात वाय सी एम ओ यु व ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण या पदविका अभ्यासक्रमाचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उपकूलपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  वर्धापन दिन कार्यक्रम दीप प्रज्वलन व केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नाशिक शहरातील विविध ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या समर्पित भगिनी व साधक उपस्थित होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले. 

COMMENTS