Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते

जालना ः मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे यांची भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया

धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो – अशोक चव्हाण
अशोक चव्हाणांसह 12 आमदार कॉंग्रेसचा ‘हात’ सोडणार ?
जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

जालना ः मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे यांची भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावतांना दिसून येत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांनी भाजप नेत्यांवर टीका करून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे अशोक चव्हाण यांनी घेतलेली भेटीतून नेमके काय राजकीय मंथन घडले याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

आंतरवाली सराटीमध्ये अशोक चव्हाण यांनी शनिवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे रात्री 11.30 वाजता सुरू झालेली चर्चा मध्यरात्री 1.30 वाजता संपली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ’’मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो. त्यावेळी भेट झाली होती. हा मराठा समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो’’, असे चव्हाण म्हणाले. तसेच मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी निवडणुकीत उमेदवार पण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तर मनोज जरांगे यांनी देखील या भेटीवर भाष्य केले आहे. अशोक चव्हाण मला भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का? असे मी आधी त्यांना विचारले असे जरांगे यांनी सांगितले. तसेच सरकारकडून आंदोलकांवर दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी अशोक चव्हाणांसमोर केला. अनेकांना पोलिस प्रशासन विनाकारण चौकशीसाठी बोलवत आहे असेही जरांगेंनी अशोक चव्हाण यांना सांगितले.तसेच यावेळी पुढे बोलतांना, आम्ही 24 तारखेला महाराष्ट्राची बैठक लावली आहे. पुढची दिशा काय ठरावाची यासाठी महाराष्ट्रातील साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, स्वयंसेवक, ज्यांनी सभांचे आयोजन केले होते ते आयोजक आणि मराठा समाज यांची बैठक घेणार आहोत. 24 मार्चला सकाळी 10 वाजता अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे. जातीशी गद्दारी करणारी आपली औलाद नाही, आणि आता तुम्हाला सुट्टी नाही. 24 मार्चला निर्णायक भूमिका ठरवणार आणि तुकडा पाडणार, असा इशारा जरांगे यांनी दिला.

COMMENTS