Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मित्र,मैत्रिणींचा गोतावळा अन तीस वर्षांनी पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा !

बीड प्रतिनिधी - तब्बल तीस वर्षांपूर्वी दहावी पास होऊन बाहेर पडलेल्या मित्र मैत्रिणींनी एकत्रित येत पुन्हा शाळेत असल्याचा आनंद घेतला.त्या काळातील

वंचितांना सत्तेत आणण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न
बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
जेवणात भात न केल्यामुळे रागातून झालेल्या भांडणात पतीने पत्नीची हत्या केली

बीड प्रतिनिधी – तब्बल तीस वर्षांपूर्वी दहावी पास होऊन बाहेर पडलेल्या मित्र मैत्रिणींनी एकत्रित येत पुन्हा शाळेत असल्याचा आनंद घेतला.त्या काळातील आजी माजी शिक्षक,स्टाफ यांचा यथोचित आदर सत्कार करत श्री शिवाजी विद्यालयातील 1994 च्या बॅच च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.गुरुजनांबद्दल आदर भावना शिष्यांमध्ये कायम असणे हे गुरूंचे यश आहे अशा भावना यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केल्या.
बीड येथील श्री शिवाजी विद्यालयातील 1994 च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन मेळावा हॉटेल ग्रँड यशोदा येथे मोठ्या आनंदात अन उत्साहात संपन्न झाला.डॉ कांचन गवते आणि संदिप ढाकणे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पुष्पवृष्टी करून गुरुजनांचे स्वागत करण्यात आले.सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात झाली.त्यानंतर डॉ कांचन गवते आणि ऍड श्रीराम पिंगळे यांनी एक प्रहसन सादर करत शाळेची आठवण करून दिली.अभय कुलकर्णी याने प्रत्येक विद्यार्थ्यांमधील गुणांचे वर्णन करणारी कविता सादर केली.  त्यानंतर माजी मुख्याध्यापक बी,टी बहिर,काकडे सर,परजने सर,मस्के सर,मातकर सर,सुपेकर सर,बिवरे सर,करपे सर,राजकुमार कदम सर,बोरखेडे सर,स्वामी सर,हजारे सर,सावंत मॅडम,शिंदे मॅडम आणि मुधोळकर मॅडम यांच्या जुन्या नव्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न लक्ष्मीकांत रुईकर यांनी मुलाखत स्वरूपात केला.  यावेळी बहुतांश शिक्षकांनी 1994 च्या बॅच मधील विद्यर्थ्यांचे कौतुक केले,आजच्या काळात तीस वर्षांपूर्वी ज्यांनी शिक्षण दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे विद्यार्थी लाभण्यासाठी भाग्य लागते अशा भावना व्यक्त केल्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली वाघिरकर, छाया कदम,ऍड श्रीराम पिंगळे,डॉ अनिल वाघमारे यांनी केले.आभार प्रदर्शन दीपाली खडकीकर यांनी केले.कार्यक्रमास किशोर मुळूक, संदिप ढाकणे,विठ्ठल जोगदंड,सन्मती पोरवाल,अभय कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, बासेद खान,परवेज,विशाल अवढाळ, वसंत मातकर,रमेश रसाळ,रमेश मोराळे,डॉ नितीन वरपे,डॉ,अनिल वाघमारे,डॉ रामदास नागरगोजे, ऍड श्रीराम पिंगळे,ऍड गिरीश कुलथे,न्या.विक्रम भंडारी,संतोष हेरकर,दत्ता जोगदंड, अनिल गाडे,बाळासाहेब भागवत,लक्ष्मीकांत रुईकर, संतोष बोरा,राहुल दुसाने,अमर फपाळ, अनंत आनेराव,संतोष खंडागळे,वैजीनाथ खंडागळे,डॉ कांचन गवते,डॉ वैशाली रसाळ,डॉ मीरा येवले,अनुराधा घायाळ,वंदना गुळवेलकर,वैशाली स्वामी,छाया शिंदे,छाया कदम,सुनेत्रा परळीकर, रुपाली वाघिरकर, सुवर्णा वरपे,अंजली झेंड, अनुजा जोशी,शेख शाहीन,दीपाली खडकीकर,रंजना औसेकर,शीतल कुलकर्णी,अर्चना बहिर,सारिका नाईकवाडे,वैशाली यादव या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

COMMENTS