जालना ः राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी अधिवेशन मागे घेतले होते, मात्र मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाच

जालना ः राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी अधिवेशन मागे घेतले होते, मात्र मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सगेसोयरे संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे. पुढील 15 दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारीत करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यावरून मनोज जरांगे यांनी आता सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे मंगळवारी रायगडावर होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आणि सरकारला महत्त्वाचं सांगायचं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की सगेसोयर्यांची जी अधिसूचना काढली आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी करायला पाहिजे. प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही हरकती-सूचना मागितल्या असल्या तरी तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. पुढील 15 दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयर्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा. तसेच, तातडीने उद्यापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू नाही केली तर 10 फेब्रुवारीला बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
COMMENTS