बिहार प्रतिनिधी - बिहारमधील सासाराम येथील पाखनारी पेट्रोल पंपाजवळ एका कंटेनरला स्कॉर्पिओची धडक बसून सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायकघटना
बिहार प्रतिनिधी – बिहारमधील सासाराम येथील पाखनारी पेट्रोल पंपाजवळ एका कंटेनरला स्कॉर्पिओची धडक बसून सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायकघटना घडली आहे मृतांमध्ये पती, पत्नी, दोन मुले आणि भाची यांचा समावेश आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कैमूर जिल्ह्यातील साबर पोलीस ठाण्याच्या कुडियारी येथील रहिवासी सुदेश्वर शर्मा यांनी त्यांचा मुलगा, मुलगी, जावई आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह सोमवारी झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा येथे आई चिन्मस्तिका देवीचे दर्शन घेतले आणि स्कॉर्पिओ खरेदी करून बुधवारी बोधगयाला गेले होते. सकाळी आपल्या गावी परतत होते. यादरम्यान स्कॉर्पिओ चालक झोपी गेला. त्यानंतर पुढे जाणाऱ्या कंटेनरला त्याने धडक दिली. यामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविले आहे.
COMMENTS