पाणी प्रश्न सोडविणारच, नगरपालिकेची सत्ता द्या : विकास करून दाखवतो – आ. आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी प्रश्न सोडविणारच, नगरपालिकेची सत्ता द्या : विकास करून दाखवतो – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- माजी आ.अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नासह मुलभूत विकासाचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे

कोविड निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार अनुदान : आ. आशुतोष काळे
kopargav:विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे माझे आद्य कर्तव्यच : आ. आशुतोष काळे| LokNews24
कोरोनाच्या संकटाचा विकासावर परिणाम होवू दिला नाही – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- माजी आ.अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नासह मुलभूत विकासाचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून जास्तीत जास्त विकासकामे करण्याबरोबरच शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविणारच आहे. तुम्ही नगरपालिकेची सत्ता द्या मी तुम्हाला विकास करून दाखवतो अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.

                              कोपरगाव पिपल्स बँकेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पिपल्स बँकेचे चेअरमन सत्येन मुंदडा, व्हा. चेअरमन सौ. प्रतिभा शिलेदार, ज्येष्ठ संचालक कैलास ठोळे, डॉ. विजय कोठारी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, सुनील बंब, हेमंत बोरावके, यशवंत आबनावे, राजेंद्र ठोळे, सुनील बोरा, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, पिपल्स बँकेचे जनरल मॅनेजर दिपक एकबोटे, जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.

              पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव शहराची विकासाच्या बाबतीत झालेल्या अधोगतीमुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे.खराब रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून त्या दृष्टीने निवडून आल्यापासून शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मीच सोडविणार आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरु असून त्याबाबत लवकरच आशादायक बातमी शहरवासीयांना देणार आहे. ज्याप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखवला तोच विश्वास येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत दाखवून नगरपालिकेची सत्ता द्या. शहरातील नागरिकांच्या विकासाच्या बाबतीत असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी भारत संचार निगम लिमिटेडच्या संचालकपदी रविकाका बोरावके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील पिपल्स बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

COMMENTS