Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मासाठी शिक्षणाची दारे खुली केली – आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व जाती धर

पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्या- आ.संदीप क्षीरसागर
गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
शेतकर्‍यांवर खोडसाळपणाने अन्याय करू नये-आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व जाती धर्मांना शिक्षणाचे महत्व पटवून सर्व जाती धर्मासाठी शिक्षणाची दारे खुले केली. येणार्‍या काळात तरुणांनी या महापुरुषाचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक चळवळ उभा करणे गरजेचे असून हेच फुले दांपत्यांना खर्‍या अर्थाने अभिवादन ठरणार असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना व्यक्त केले.
11 एप्रिल 1 827 सामान्य माळी कुटुंबात जन्मलेले महात्मा ज्योतिराव फुले यांनी लहान वयापासूनच शिक्षणाचे महत्त्व समजून घेतले. त्याकाळी शिक्षण शिकणे हे फक्त श्रीमंत कुटुंबातील लोकांचे काम होते. इंग्रजांची राजवट असल्याकारणाने सामान्य लोकांना शिक्षण घेणे हे कठीण होत चालले होते. अशा परिस्थितीत ज्योतिराव फुले यांनी सर्व जाती धर्मांना शिक्षण भेटावे ही मनाशी खून गाठ बांधली आणि त्यात क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांची खंबीर साथ त्यांना लाभली. आजी मुलगी मोठ्या हुद्द्यापर्यंत पोचली आहे याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलींची शाळा सुरू करून केली आहे. आजची तरुणी सावित्रीबाईंनी आपल्यासाठी काय केले आहे याचे पुरेसे ज्ञान नसून तरुण आणि तरुणींनी फुले दांपत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे सुरू ठेवून तळागाळापर्यंत त्यांचे विचार पोचवावे हेच खरे फुले दांपत्यांना अभिवादन आहे असे विचार आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले याप्रसंगी शेकडोच्या संख्येने सर्व जाती धर्मातील युवक ज्येष्ठ नागरिक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

COMMENTS