Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचे निधन

‘सोळावे वरीस धोक्याचे’ ते ‘कसं काय पाटील बरं हाय का’लावण्यांची मोहीनी

मुंबई प्रतिनिधी : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. गेल्या काही द

समृद्धीवरील अपघातात 12 जणांचा मृत्यू
आमदारांनी बाजार समितीला राजकीय आखाडा बनवू नये
1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची निर्दोष सुटका

मुंबई प्रतिनिधी : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी (10 डिसेंबर) त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याच माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे.
सुलोचना ताईंचे आणि लावणीचे एक वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी ठसकेबाज लावणी गात प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली होती. तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणार्‍या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर वाजता  काल दुुपारी 3 वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


दरम्यान, लावणीत ठसका आणि खटका हा हवाच, त्याशिवाय लावणी रंगत नाही, असे सुलोचनाताई नेहमीच म्हणायच्या. सुलोचना चव्हाण यांच्या लावणीत या दोन्ही शैली होत्या आणि म्हणूनच त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’ हा किताब बहाल करण्यात आला होता. अगदी लहान असल्यापासून त्यांना लावणीच्या सुरांनी मुग्ध केले होते. रेडीओवर ऐकून त्या लावणी गुणगुणायाच्या. सुलोचना चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लावण्यांना स्वरसाज चढवला. त्यांनी गायलेली सगळीच लावणी गीतं सुपर हिट ठरली. आचार्य अत्रे लिखित ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिली लावणी गायली. या चित्रपटातील ‘मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊन बीए बीटी’ ही त्यांनी गायलेली लावणी तुफान गाजली. यानंतर त्यांनी अनेक लावण्यांना आपला आवाज दिला. यातील काही लावण्या तुफान गाजल्या. ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातली ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’, ‘मल्हारी मार्तंड’ चित्रपटातील ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ आणि ‘आई मला नेसवं शालू नवा’, ‘सवाल माझा ऐका’ चित्रपटातील ‘सोळावं वरीस धोक्याचं’ आणि ‘कसं काय पाटील बरं हाय का’, याशिवाय ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘कळीदार कपूरी पान’, ‘औंदा लगीन करायचं’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ या गाण्यांनी आजही रसिक प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.

COMMENTS