Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांवर खोडसाळपणाने अन्याय करू नये-आ.संदीप क्षीरसागर

बीड मतदारसंघातील महसूल मंडळे अग्रीम मंजूरीतून वगळली

बीड प्रतिनिधी - जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपून नष्ट झाली आहेत. खरीप हंगामात पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मासाठी शिक्षणाची दारे खुली केली – आ.संदीप क्षीरसागर
आ.संदीप क्षीरसागरांचा शहरवासीयांना दिलासा !
गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या

बीड प्रतिनिधी – जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपून नष्ट झाली आहेत. खरीप हंगामात पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा मागण्या केल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम मंजूर केला. परंतु यातून बीड तालुक्यातील नाळवंडी, पाली, म्हाळसजवळा ही महसूल मंडळे व शिरूर का. तालुक्यातील तिंतरवणी सोडता सगळीच महसूल मंडळे वगळण्यात आली. हा येथील शेतकर्‍यांवर अन्याय असून बीड मतदारसंघातील सर्व महसूल मंडळांना सरसकट अग्रीम मंजूर करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकार्यांकडे  केली आहे.
बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाने खूप मोठा खंड दिला आहे. तब्बल एक महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षाही खूप जास्त आहे. अशी परिस्थिती जिल्ह्यात सर्वत्रच आहे. विमा कंपनीच्या नियमानुसार 21 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड आणि पिकांचे 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान असल्यास एकूण संरक्षित विमा रकमेच्या 25 टक्के अग्रीम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार अनेक मागण्या केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अग्रीम मंजूर करण्याबाबत अधिसूचना काढली आहे. परंतु अग्रीम मंजूरीतून बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत असलेल्या बीड तालुक्यातील नाळवंडी, म्हाळसजवळा, पाली तसेच शिरूर का. तालुक्यातील तिंतरवणी महसूल मंडळ सोडता इतर सर्वच मंडळे वगळण्यात आली आहेत. गतवर्षी देखील या महसूल मंडळातील शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे. या मंडळातही 50 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असतानाही खोडसाळपणाने शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे एकूण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्व मंडळांसाठी सरसकट अग्रीम मंजूर करण्याची मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

COMMENTS