Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज तालुक्यातील नायगांव येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील नायगांव येथे बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक,समतेचे प्रणेते तथा लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची 9

तरुणाला सात आठ जणांनी मारहाण केल्याचा आरोप | LokNews24
कर्नाटकात काँग्रेस स्वबळावर लढणार निवडणूक
त्या सहा मोकाट आरोपींना अटक करा ; गजरमल यांची मागणी

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील नायगांव येथे बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक,समतेचे प्रणेते तथा लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची 918 वी जयंती साजरी करण्यात आली.नायगांव येथील तरुणांनी महात्मा बसवेश्वर यांचा चौक आणि पुतळा स्थापन करण्याचा संकल्प करत बसवण्णा यांच्या जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर चौक स्थापन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी व्याख्यानाचा कार्यक्रमही घेण्यात आला.समाजाला समतेची शिकवण देणारे बसवण्णा , हे कर्नाटकातील संत , समाजसुधारक होते . त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला . त्यांनी निर्गुण , निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला असे विचार शिवलिंग गुजर यांनी सांगितले. यावेळी सरपंच विवेक खोडसे, चेरमन रामकिसन खोडसे,दिलीप पाटील,डॉ.उत्तम खोडसे, आमोल खोडसे राहुल खोडसे,सूरज खोडसे,प्रवीण खोडसे,शिवलिंग गुजर ,मनोज गुणवंत गुजर,गणेश गुजर,दत्तात्रय गुजर,विजयकुमार गुजर,शंकर पाटील,महेश गुजर,मन्मथ गुजर,भिमराव गुजर,बळीराम गुजर,दीपक गुजर,सोमनाथ गुजर,गुणवंत पकवे,आकाश गुजर,बाबा पोटभरे,गणेश गंभीरे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS