संजीवनीचा महर्षी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

संजीवनीचा महर्षी

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विधानसभेत निर्णायक असलेले संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे याचे दुःखद निधन महाराष्ट्राच्या

पुन्हा कोरोनाचे सावट
द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ
हलगर्जीपणाचे बळी

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विधानसभेत निर्णायक असलेले संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे याचे दुःखद निधन महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण करणारे आहे. ते सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक, संजीवनी कारखान्याचे संचालक तसेच माजी सहकारमंत्री, ज्येष्ठ नेते, म्हणून सर्वत्र परिचित असले तरी त्यांचा सर्वच क्षेत्रात दांडगा अनुभव राहिलेला आहे. अशा  शंकरराव गेनुजी कोल्हे यांचे वयाच्या 93 वर्षी नाशिक येथे सुश्रुत रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. एक मातब्बर सहकार तज्ज्ञ, महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची कामगिरी बजावणारे आणि  पाणी प्रश्नावर शेवटपर्यंत लढा देणारे व सर्व विषयांचा गाढा अभ्यास असलेले नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्रभर आणि देशभर ओळख होती.
सहकार महर्षी, माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी १९६० मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले हे त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासाला नोंद घ्यायला लावणारे आहे. १९७२ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची उमेदवारी केली आणि कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने येथून सुरू झालं. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते.
शंकरराव गेणूजी कोल्हे यांचा जन्म २४ मार्च १९२९ झाला होता. त्यांनी येसगावचे म्हणून वयाच्या एकविसाव्या वर्षी काम केले. तेव्हापासून ते सक्रिय राजकारणात उतरले होते. पुढे त्यांनी अनेक क्षेत्रात आपल्या चाणाक्ष नीतीने आपल्या विविध व्यवसायाचा आवाका वाढवला. शंकरराव कोल्हे हे  नॅशनल हेवी इंजिनीअरचे संस्थापकही होते. सहकारी लि., पुणे, संजीवनी ग्रामीण शैक्षणिक संस्था, कोपरगाव, गोदावरी (खोरे) सहकारी दूध संस्था, यशवंत पोल्ट्री, देवयानी सहकारी बँक लि., कोपरगाव च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण विकासाला चालना दिली आहे. शेती क्षेत्रात त्यांचे कार्य भरीव असे आहे.
त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याचा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे. विविध संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिलेला आहे. या परिसरात त्यांच्या कामगिरीतून अनेक प्रकल्प उदयाला आलेले आहे. सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
 ग्रामीण भागातील शेतकरीची मुले देश-विदेशात उच्च पातळीवर काम करताना दिसली पाहिजे यासाठी त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालय उभे करून त्यात कालानुरूप बदल घडवत विविध अभ्यासक्रम आणले आणि शेतकऱ्याच्या मुलाला शिकवले, त्याला प्रगतीचा मार्ग दाखवला. ग्रामीण जीवनाचा बाज अंगी बाळगत त्यांनी धाडसाने सर्वच क्षेत्रात काम केले. कोल्हे यांनी दीर्घकाळ कोपरगावचे (जि. अहमदनगर) प्रतिनिधीत्व केले. कोपरगावचे सरपंच ते त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार असा विलक्षण प्रवास त्यांनी केला.

COMMENTS