Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्राला अग्रस्थानी आणावे

राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही

विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम
तालिबान्यांचे समर्थन करणाऱ्यांना नाकारा- राष्ट्रीय मुस्लीम मंच
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची दोरी राज्यपालांच्या हाती

मुंबई : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थानी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले.
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लोकसभेच्या या चारही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘स्वीप’च्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागांतर्गत येणार्‍या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय (बीएलओ) आणि क्षेत्रीय अधिकार्‍यांसाठी ‘क्षमता विकास आणि जीवन बदलण्याची कला’ या विषयावरील 23 व्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष निरीक्षक गंगवार बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, निवडणूक निर्णय अधिकारी दादाराव दातकर, ‘स्वीप’चे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, तहसीलदार प्रिया जांबळे-पाटील, स्वीपचे सल्लागार भारत मराठे उपस्थित होते. विशेष निरीक्षक गंगवार म्हणाले की, लोकशाहीच्या सक्षमीकरण आणि संवर्धनासाठी मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी संयुक्तरित्या मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व मतदाराला मतदान प्रक्रिया आनंददायी वाटेल यासाठी प्रयत्न करावे. मतदान प्रक्रिया शांततामय वातावरण, कमी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने होईल यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

COMMENTS