Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूरग्रस्तांना वन बुलढाणा मिशनचा मदतीचा हात 

३० गावांत जीवनाशयक वस्तूंचे वाटप, उभारले तात्पुरते निवारे, वैद्यकिय छावणीचेही नियोजन

जळगाव जामोद : जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाला वन बुलढाणा मिशनच्या टीमने मदतीचा हात दिला आहे. ३० गावांमध्ये जीवनावश्यक वस्तू

मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार
एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
व्याजापोटी सावकाराने नेल्या शेळ्या: आठवड्यात सावकारीचा तिसरा गुन्हा दाखल

जळगाव जामोद : जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाला वन बुलढाणा मिशनच्या टीमने मदतीचा हात दिला आहे. ३० गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत. वैद्यकीय छावणीचेही नियोजन करण्यात आले आहे.  राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके शनिवारी रात्रीपासून पूरग्रस्त भागात  मदतीसाठी थांबलेले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी वडगाव पाटण, वडशिंगी, भेंडवळ, मडाखेड खुर्द, इलोरा काजेगाव, एकलारा बनोदा, सुनगाव, जामोद, सोनाळा, बावनबीर, मारोर, कवटळ, संग्रामपूर, कर्मोडा, धामणगाव, वाडी, काकोरा, बोडका आणि परिसरातील गावांना भेटी दिल्या. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोद येथील मधुकर धुळे यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. इलोरा संस्थानमध्येही पावसाचे पाणी, गाळ साचला. वन बुलढाणा मिशनच्या सदस्यांनी संस्थानची साफसफाई केली.

नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्या – अतिवृष्टीमुळे या परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कुणाचं घर पडलं. कुणाचं धान्य भिजलं. कुणाची शेती खरडली. कुणाचे शेतीसाहित्य पुरात वाहून गेले. कपडे, पुस्तके, भांडी, फर्निचरची नासधूस झाली. शासनाने या नागरिकांना भरीव मदत करण्याची गरज आहे. तीन- चार हजाराचे सानुग्रह अनुदान देऊन भागणार नाही. या लोकांचे दुःख खूप मोठे आहे. त्यातुलनेत शासनाची मदत मिळावी, अशी मागणी संदीपदादा शेळके यांनी केली आहे.

COMMENTS