Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र केसरीस पै. संजय पाटलांच्या स्मरणार्थ एक लाखाचे बक्षीस जाहीर

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स

भारतीय कर्णधार सुनील छेत्री होणार बाबा !
रोहित शर्माची अमेरिकेत क्रिकेट अकॅडमी
वरकुटेच्या मुली सलग दुसर्‍यांदा कबड्डीत राज्यात अव्वल; चार मुलींची राज्याच्या संघात निवड

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु आहे. त्या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लास महाराष्ट्र केसरी (कै) संजय पाटील आटकेकर यांच्या स्मरणार्थ एक लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र चॅम्पियन आणि संजय पाटील यांचे बंधू धनाजी पाटील यांनी केली.
अकोला येथे सन 1994 मध्ये झालेल्या स्पर्धेत आटके गावचे सुपूत्र संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. यावर्षीची स्पर्धा सातारच्या मातीत होत आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. संजय पाटील यांच्या पश्‍चात त्यांच्या कुटूंबीयांकडून जिल्ह्यातील मल्लांना नेहमीच प्रोत्साहन देत गोरगरीब मल्लांना मदत करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. लाल मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि संजय पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र केसरी किताब पटकावणार्‍या मल्लाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले.

COMMENTS