Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी

सातारा / प्रतिनिधी : आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा शहराची हद्दवाढ मंजूर केली. हद्दवाढ

Nashik : भगवा झेंडा फडकवायच्या कामाला लागा
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष
शिवंम प्रतिष्ठानतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा कोव्हीड योध्दा आरोग्य पुरस्काराने सन्मान

सातारा / प्रतिनिधी : आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा शहराची हद्दवाढ मंजूर केली. हद्दवाढीत समाविष्ट भागात मुलभूत सोयी सुविधा आणि विविध विकासकामे करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून ना. पवार यांच्या सहकार्यामुळे 48 कोटी 50 लाख 46 हजार 122 रुपये मंजूर झाले आहे. त्यातील पहिला हप्ता 25 कोटी रुपये राज्य शासनाकडून नगरपालिकेकडे वर्ग केला आहे. यामुळे हद्दवादीत समाविष्ट झालेल्या नवीन भागातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार आणि ना. शिंदे यांचे आभार मानले आहेत.
सातारा शहरालगतच्या त्रिशंकू भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा भाग सातारा पालिकेच्या कार्यक्षेत्रात येणे आवश्यक होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सातारा शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळवली. ज्या ना. अजित पवार यांनी हद्दवाढीला मंजुरी दिली. त्यांच्याच माध्यमातून आता या नवीन भागाच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने हद्दवाढीत समावेश झालेल्या या नवीन भागातील रस्ते, गटर, पथदिवे आदी मुलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात निधीला मंजुरी दिली होती. त्यातील पहिला हप्ता 25 कोटी रुपये नुकताच नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे.
सातारा शहराच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूपुरी, शाहूनगर, पिरवाडी, विलासपूर आदी भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध झाला असून आता या भागातील अनेक प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. ना. पवार यांच्यामुळे हद्दवाद मंजूर झाली आणि ना. पवार आणि ना. शिंदे यांनी या नवीन भागासाठी निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल सातारकरांच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोघांचे आभार मानले.

COMMENTS