इस्लामपूर / प्रतिनिधी : येलूर, (ता. वाळवा) येथील झालेल्या तीनही सोसायटी निवडणुकीत महाडिक गटाचे दमदार वर्चस्व कायम राहिले. महाडिक गटाने आपला झेंडा
इस्लामपूर / प्रतिनिधी : येलूर, (ता. वाळवा) येथील झालेल्या तीनही सोसायटी निवडणुकीत महाडिक गटाचे दमदार वर्चस्व कायम राहिले. महाडिक गटाने आपला झेंडा फडकला आहे. तीन्ही सोयट्यांच्यावर वर्चस्व आणून भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी हॅट्रिक साधली आहे.
निवडणुकीत राजारामबापू व वारणा सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक गटांना दारुण पराभव पत्करावा लागला. येलूर ग्रुप सोसायटीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. या सोसायटीमध्ये महाडिक गटाचेच प्राबल्य आहे. येलूर नं 1 व 2 विकास सोसायटी येलूर पंचवार्षिक निवडणूक 2022 निवडणुक निकालामध्ये 12-1 च्या फरकाने 1 व 2 या दोन्ही सोसायट्यांमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाला.
वाळवा शिराळा दूध संघाचे अध्यक्ष सम्राट महाडिक, माजी जि. प. सदस्य विद्यमान सरपंच पेठ मीनाक्षीताई महाडिक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक यांच्या सर्वसमावेशक पॅनेलने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा 12/1 ने धुव्वा केला. महाडिक समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
विजय उमेदवार पुढीलप्रमाणे : गोविंद ठोंबरे, ईश्वरा गावडे, अरविंद गायकवाड, भगवान मांगलेकर, संजय जाधव, वसंत जाधव, पुष्कराज पाटील, विजय पाटील, नागेश शिनगारे, सुवर्णा गायकवाड, रत्नाबाई पाटील. यावेळी सतीश महाडिक, भास्करराव जाधव, ज्येष्ठ नेते भगवान जाधव, भास्कर पाटील, धनाजी पाटील, सुरेश पाटील, विनायक महाडिक, सरदार गायकवाड, महिपती गायकवाड, विजय पाटील, अभिजित जाधव, बाळासाहेब घेवदे, शहाजी पाटील, जयशिंग जाधव, रणजित आडके उपस्थित होते.
COMMENTS