Homeताज्या बातम्यादेश

LPG गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली प्रतिनिधी - सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्रेत्या कंपन्यांनी शुक्रवार, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती २१ रु

रवी राणाला फुटाण्यासारखं फोडेन
येवल्यात कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला केली मारहाण l पहा LokNews24
शिराळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

नवी दिल्ली प्रतिनिधी – सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्रेत्या कंपन्यांनी शुक्रवार, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती २१ रुपयांनी वाढवल्याचे वृत्त आहे. दर वाढीनंतर, १९-किलोग्राम व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत नवी दिल्लीमध्ये १,७९६.५ रुपये आणि मुंबईमध्ये १,७४९ रुपये करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये किंमत १९६८.५ रुपये असेल तर कोलकातामध्ये १९०८ रुपये करण्यात आली आहे. हे दर आजपासून लगेचच लागू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी १६ नोव्हेंबरला व्यावसायिक एलपीजीच्या किमती ५७ रुपयांनी कमी झाल्या होत्या. तर आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमध्ये मतदान पूर्ण होताच पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्यात आले आहेत. येत्या ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा म्हणजेच मतमोजणी व निकाल असणार आहे.यापूर्वी ऑक्टोबरमध्ये, ओएमसीने व्यावसायिक एलपीजीच्या किमती २०९ रुपयांनी वाढवल्या होत्या, आणि त्याआधी सप्टेंबरमध्ये १५८ रुपयांची कपात केली होती. इस्त्रायल-हमास युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली होती परिणामी आता व्यावसायिक सिलिंडरचे भाव सुद्धा वाढले आहेत.

COMMENTS